Sunday, October 17, 2021
No menu items!
HomeUncategorizedगेवराई तालुक्यातील वाळू प्रकरणी आ.पवारांचे विधान भवनाच्या पायर्‍यांवर उपोषण

गेवराई तालुक्यातील वाळू प्रकरणी आ.पवारांचे विधान भवनाच्या पायर्‍यांवर उपोषण


मुंबई (रिपोर्टर)- वाळू प्रकरणातल्या विविध मागण्यांसाठी गेवराई येथे उपोषण करणारे आमदार लक्ष्मण पवार यांच्या मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या न्याय-हक्काच्या मागण्यांसाठी आज आ. पवारांनी थेट विधान भवनाच्या पायर्‍यांवर उपोषणास बसले असून त्यांच्या सोबत  आ. राजेश पवार यांनीही उपोषण सुरू केले आहे.

q3 1


   गोदावरी व सिंदफणा नदी पात्रातून होत असलेल्या बेसुमार अवैध वाळू उपश्याविरोधात गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी सातत्याने शासनासह प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघात वाळू वाहतूक करणार्‍या टिप्परमुळे अपघात होऊन काहींचे मृत्यू झाले. त्यामुळे आ. पवारांनी वाळू उपश्याबाबत काही मागण्या केल्या. त्यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी गेवराई येथे उपोषण केले होते. त्या वेळी प्रशासनाने त्यांना आश्‍वासन दिले होते. मात्र त्या आश्‍वासनाची पुर्तता केली नाही म्हणून आज पुन्हा आ. पवारांनी आपलं उपोषण अस्त्र उपसले आहे. वाळुचे टेंडर काढताना अपसेट किंमत कमी करावी, त्यामुळे सामान्य माणसांना माफक दरात वाळू मिळेल. वाळुची वाहतूक टिप्पर या अवजड वाहनाऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करावे जेणेकरून रस्त्याची दुरावस्था होणार नाही व नारिकांच्या जिवाला धोका निर्माण होणार नाही. त्याचबरोबर अवैधरित्या अवजड वाहनाने वाळू वाहतूक केल्यामुळे खराब जालेल्या रस्त्यांची दुरुस्ती व निर्मितीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी आ. लक्ष्मण पवार व आ. राजेश पवार हे उपोषणाला बसले आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!