Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडवडवणीवडवणीच्या आठवडी बाजाराची गर्दी ओसरली !

वडवणीच्या आठवडी बाजाराची गर्दी ओसरली !

वडवणी (रिपोर्टर):- वडवणी शहरातील आठवाडी बाजार नेहमी प्रमाणे न भरता आज काही प्रमाणात गर्दी ओसरल्याची पाहवयास मिळाली असून कोविड १९ यांचे लोक नियम पाळताना देखील दिसून आले आहेत.
वडवणी शहरासह तालुक्यातील जनतेचा मुख्य दिवस म्हणुन बुधवार ओळखला जातो.या दिवशी आर्थिक लेण-देण करुन व्यवहार केला जातो.त्याचप्रमाणे आठवडाभर पुरेल असा अन्न,धान्य,किराणा आणि भाजीपाला आणण्यासाठी आजच्या दिवशी लोक गर्दी करत आसतात.परंतू गेल्या आठ दहा दिवसांपासून कोरोनाच्या अदृश्य विषाणूने डोके वर काढले असल्याने राज्यासह जिल्ह्यात रुग्णांचा आकडा वाढल्याच पाहवयास मिळाले असल्याने शासन आणि प्रशासनाने हायअर्लट जनतेला दिले आहेत.यांचीच दक्षता आणि काळजी म्हणुन आज वडवणी शहरातील आठवडी बाजार तळावर आणि पेठेत जवळपास ५०% पेक्षा हि कमी गर्दी पाहवयास मिळाली आहे.तर लोकांनी आणि व्यापारी बांधवानी मास्कचा वापर करत असल्याच आढळून आले आहे परंतू आता ऊसतोडणी कामगार देखील गांव पातळीवर डेरेदाखल होऊन देखील आजच्या वडवणी येथील आठवडी बाजारात म्हणावी तेवढी गर्दी साडेबारा वाजेपर्यत तरी पाहवयास मिळाली नसल्याने कोरोनाचे नियम आणि प्रशासनाच्या आव्हानाला जनतेनी प्रतिसाद दिल्याच पाहवयास मिळत आहे.


कव्हरिंग क्षेत्राच्या बाहेर
तहसिलदार यांनी व्यापाऱ्यांना अल्टिमेट देऊन आजचा तिसरा दिवस आहे.या तीन दिवसांत अँन्टीजन आणि आरटीपीसीआर टेस्ट किती झाल्या ? काय परस्थिती आहे.याबाबत रिपोर्टरने वडवणी तालुका आरोग्य आधिकारी डॉं.मधूकर घुंबडे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला आसता कव्हरिंग क्षेत्राच्या बाहेर असल्याच सांगण्यात आले आहे.तर ग्रामीण रुग्णालय चिंचवण येथील वैद्यकीय अधिक्षक डॉं. करमाळकर यांच्याशी हि संपर्क केला आसता त्यांनी देखील कोणताच रिस्पॉंश न देता भ्रमणध्वनी उचल्याचे कष्ट घेतले नाही.

तहसिलदारांचा व्यापा़र्‍यांना अल्टिमेट
वडवणी शहरातील व्यापारी बांधव व कर्मचारी यांनी ५ मार्च पर्यत अँन्टीजन टेस्ट करुन घ्यावी.अन्यथा जे व्यापारी या नियमांचे पालन करणार नाहीत. अशाच्या दुकानाचे शटर डाऊन करुन दंडात्मक कार्यवाही केली जाईल अशा अल्टिमेट वडवणीच्या तहसिलदार वैशाली पाटील यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!