Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाकेंद्रेकरांनी अधिकार्‍यांना झापझाप झापले चिंता वाढली, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; विभागीय आयुक्त केंद्रेकरांकडून...

केंद्रेकरांनी अधिकार्‍यांना झापझाप झापले चिंता वाढली, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; विभागीय आयुक्त केंद्रेकरांकडून तातडीची बैठक

प सुधरा नसता राजीनामे द्या, कर्मचार्‍यांना इशारा
प जिल्हा रुग्णालयात प्रयोगशाळा उभारा
प निधीला तात्काळ मंजुरी देतो
प अँटीजेन टेस्टऐवजी आरटीपीसीआर टेस्ट करा
प दोन हजार बेड तयार ठेवा
प दररोज कोरोना टेस्टची संख्या वाढवा
प मास्क न वापरणार्‍यांविरोधात सक्तीने कारवाई करा

बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने याची दखल विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी घेतली. आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी अधिकार्‍यांना चांगलेच झापझाप झापले. रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून २ हजार बेड तयार ठेवण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. मास्क न वापरणार्‍यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. इथून पुढे बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही. जे अधिकारी बेजबाबदारपणे वागतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीमध्ये दिल्या.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने लोकांसह प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. कोरोना हा आजार गेल्या वर्षभरापासून असल्यामुळे आरोग्य प्रशानाला आणि महसूल प्रशासनाला हा आजार बर्‍यापैकी माहित झालेलाआहे मात्र या आजाराची साथ जरू काही कालच आलेली आहे, अशा प्रमाणे आरोग्य विभागातील प्रशिक्षीत डॉक्टर आणि कर्मचारी वागत आहेत. आरोग्य विभागाच्या चुकांकडे महसूल विभाग डोळेझाक करत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात या रुग्णाचे लक्षणे काय आहेत? त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे माहित असतानाही माहित नसल्याचे ढोंग तुम्ही आणत आहेत. आरोग्य विभागातील डॉक्टर आणि कर्मचारी स्वत:ची जबाबदारी सोडून, स्वत:च्या चुकांकडे दुर्लक्ष करून ह्या चुका पेशंटच्या माथी मारत आहात त्यामुळे बीड जिल्ह्यातील रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ही चिंतेची बाब आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णांचे तपासणीचे सँपल अंबाजोगाईला कशासाठी पाठवता, आज पाठवलेला सँपल उद्या येतो, दोन दिवस यातच जातात. तातडीने बीड रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांचे तपासणी लॅब उभारा, लॅबसाठी जो खर्च येतो तो खर्च जिल्हा नियोजनमधून करा. त्याचा प्रस्ताव आजच्या आजच माझ्याकडे पाठवा, उद्या मी त्याला मंजुरी देतो. ऍडमिट झालेल्या प्रत्येक रुग्णाची ऑक्सीजन लेव्हल तपासा, भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, फळ विक्रेते यांच्या तुम्ही फक्त अँटीजेन टेस्ट करता, कधी कधी कोरोना रुग्ण अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून येत नाही त्यामुळे इथून पुढे सर्व टेस्ट ह्या आरटीपीसीआर झाल्या पाहिजेत. कोरोना रुग्णाला ऑक्सीजन देताना त्या ऑक्टीसनच्या ओटूमधील पाणीसुद्धा बदलले जात नाही, अशा एक ना अनेक चुका आरोग्य विभागाच्या आहेत. त्याला जिल्हा महसूल प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी पाठिशी घातले नाही पाहिजे. येणारे दोन महिने अतिशय काळजी करण्यासारखे आहेत. या दोन महिन्यामध्ये रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर भर पडणार आहे. प्रत्येकाला मास्क अत्यावश्यक करा, विनामास्क कोणी दिसले तर पोलीसांनी सक्तीने कारवाई करावी, असे म्हणत विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी आज अचानकपणे जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या अनुषंगाने बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, उपायुक्त सुरेश बेदमुथ्था, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी सोनसळे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे सीओ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते, डीएचओ राधाकिसन पवारसह सर्व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, अंबाजोगाईच्या स्वारातीचे अधिष्ठाता आदींची उपस्थिती होती.

त्या रुग्णांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना
कोविड वॉर्डामध्ये ऍडमिट असताना रुग्णांनी बाहेर येऊ नये, असे नियम आहेत. मात्र या नियमांना डावलून लोखंडी सावरगाव येथील तीन रुग्ण बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या प्रकरणी केंद्रेकर यांनी संबंधितांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

मिडियाला तात्काळ माहिती द्या
रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून दोन हजार बेड तयार ठेवून ऑक्सीजनही तयार ठेवा, अशा सूचना केंद्रेकर यांनी आरोग्य विभागाला दिल्या असून कोरोना बाबतची माहिती मिडियाला तात्काळ देत जा, असेही संबंधित विभागाला त्यांनी सांगितले आहे.

Most Popular

error: Content is protected !!