ग्रामपंचायतच्या आवाहनाला नागरीकांचा प्रतिसाद
आष्टी(रिपोर्टर): राज्यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेने उद्रेक वाढवला असून या विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.जिल्हाधिकारी यांनी बीड जिल्ह्यात निर्बंध कठोर केले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आष्टी तालुक्यातील कडा ग्रामपंचायतचे सरपंच अनिल ( तात्या ) ढोबळे,ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे,सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामपंचायतच्या वतीने शनिवार व रविवारी दोन दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत स्व स्फूर्तीने नागरिक बंद पाळत आहेत.
जिल्हयातील कोरोना बाधिक रुग्णांची वाढणारी संख्या चिंता वाढवणारी असून आष्टी तालुक्यामध्ये ही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून कडा शहर येथील तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असून परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या प्रमाणावर आठवडी बाजारात गर्दी करतात रविवारी जनावरांचा बाजार,व भाजीपाला बाजार असल्याने नागरीकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते.या वाढणा-या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी दवंडी देऊन शनिवारी व रविवारी २ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांना शनिवारी संपूर्ण दिवसभर बाजारपेठेतील सर्व दुकानदारांनी दुकाने बंद ठेवले होते व आज दि.२१ रोजी आज सकाळपासून शहरात शुकशुकाट दिसत आहे.कडेकरांनी २ दिवसांच्या पाळलेल्या जनता कर्फ्यू ने जिल्ह्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.इतर शहरे कडेकरांचा वाढता कोरोना चा संसर्ग पाहता आदर्श घेणार का हे पाहणे उचित ठरेल.