Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडशेतकर्‍यांचा प्रश्‍न कराडांनी अधिकार्‍यांकडे मांडला

शेतकर्‍यांचा प्रश्‍न कराडांनी अधिकार्‍यांकडे मांडला


3 हजार रुपये भरल्यानंतर कनेक्शन जोडण्याचे दिले आश्‍वासन
परळी (रिपोर्टर):- थकबाकीदारांचे कनेक्शन तोडण्याची मोहीम विज वितरण कंपनीने हाती घेतली आहे. आज काही शेतकर्‍यांना सोबत घेऊन फुलचंद कराड विज वितरण कार्यालयात दाखल झाले होते. या वेळी कराड आणि अधिकार्‍यात चर्चा झाली. प्रत्येक शेतकर्‍याने 3 हजार रुपये विजेचा भरणा भरावा आणि कनेक्शन सुरू करावे, असे आश्‍वासन देण्यात आले आहे.
रब्बीच्या हंगामात विजेचे कनेक्शन तोडल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होऊ लागले आहे. परळी तालुक्यातील काही शेतकर्‍यांना सोबत घेऊन फुलचंद कराड विज वितरण कार्यालयात दाखल झाले होते. या वेळी त्यांनी शेतकर्‍यांना काही प्रमाणात सुट देण्याची मागणी केली. त्यानुसार अधिकार्‍यांनी प्रत्येक शेतकर्‍याने 3 हजार रुपये भरल्यानंतर विजेचे कनेक्शन सुरू करण्याचे आश्‍वासन दिले.

Most Popular

error: Content is protected !!