Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडग्राउंड रिपोर्टींग- 61 कोटींची रहस्यमय ठिणगी

ग्राउंड रिपोर्टींग- 61 कोटींची रहस्यमय ठिणगी


जप्ती पारगाव जवळ असलेल्या वेअर हाऊसमधील कापसाच्या गठाणीला लागलेल्या आगीचे रहस्य कायम, पोलीस व प्रशासनाकडून कसून चौकशी सुरू
अर्धजळीत कापसाचे व राखेचे नमुणे तपासणीसाठी प्रयोग शाळेत; बीड ग्रामीण पोलीसांनी अग्निशमन दल, ग्रामपंचायत, बांधकाम विभाग, महावितरण विभाग व वखार महामंडळाला पत्र व्यवहार करून मागविली संबंधित वेअर हाऊचा अहवाल
तब्बल 45 तास आगीतून धुर निघत होते, 40 ते 42 पाण्याचे बंब एकट्या बीड अग्निशमन दलाच्या जवानाने फवारले; गेवराई औरंगाबादहून आलेले बंब वेगळेच, अशा प्रकारे 50 तासानंतर आग आली आटोक्यात
रिपोर्टरच्या सर्व्हेक्षणात धक्कादायक माहिती आली समोर, संबंधित वेअर हाऊसने अग्निशमन विभागाची एनओसी घेतली नव्हती; आता जिल्ह्यातील वेअर हाऊस व जिनिंगसह इतर कंपनींच्या एनओसी तपासणी मोहिम राबविण्याची गरज
अग्निच्या तांडवात घटनास्थळी राखेत तीन अग्निशमन यंत्र पुर्ण जळलालेल्या अवस्थेत रिपोर्टरच्या प्रतिनिधीने शोधून काढले, नेमके ते अग्निशमन यंत्र आहे का? समजून येत नाही; सुदैवाने त्याचे स्फोट झाले नाही
ज्याअर्थी वेअर हाऊसची खांब आगीच्या टेंम्प्रेचरने लाल होवून कोलमडून पडली तर ते लोखंडी सिलेंडर अग्निशमन यंत्रासारखे दिसणारे घटनास्थळी मिळून आलेले सुदैवाने त्याचा स्फोट झाले नाही; भयानक दुर्घटना टळली
आग लागल्यानंतर औरंगाबादहून येणारे दिपक सुराणा यांनी आगेचा कल्लोळ पाहून कोटेचा यांना मोबाईलवरून आग लागल्याची दिली माहिती, कोटेचा यांनी अग्निशमन दलाला 11 वाजून 38 मिनिटाला आग लागली असल्याची दिली माहिती
वेअर हाऊसमध्ये कोणतेही वीज कनेक्शन नाही, चोही बाजूने तार कंपाऊंड बांधलेले, 24 तास वॉचमनची सुरक्षा तर मग आग लागली कोठुन? पोलीस प्रशासन घेतायत शोध
एवढ्या मोठ्या वेअर हाऊसमध्ये सीसीटीव्ही नाही, वीज कनेक्शन नाही, फायर संदर्भात एनओसी नाही, अधिकृत कंपनीचे कदाचित वॉचमनही नसतील? तर मग 61 कोटीचा जर विमा झाला असेल तर कसा?
जिनिंग, वेअर हाऊससारख्या कंपनीचे इन्शुरन्स करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व नियमाने अटी याचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे, या संदर्भात कधी विमा कंपनीने किंवा पणन महासंघाने वेअर हाऊसमध्ये जावून पाहणी केली का?
अशा वेअर हाऊससारख्या अनेक ठिकाणी फायर एनओसी नाही, अशा अनेक कंपन्या खासगीतून अग्निशमन यंत्र बसवतात या संदर्भात संबंधित वेअर हाऊसमधील कर्मचार्‍यांना अग्निशमन यंत्र चालविण्यासाठी ट्रेनिंग देण्यात आली होती का? तसेच अग्निशमन यंत्र वेळेवर रिफील करतात का?
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साबळे यांच्याकडून या प्रकरणाचा तपास कसून सुरू असून यात अद्याप गुन्हा दाखल झालेले नाही, रिपोर्टरच्या हाती लागलेल्या माहिती नुसार गुप्त यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत असल्याचे समजते

ground reporting


कापसाचा सिझन सुरू झाले की आगीचे लोट कोठून तरी उठलेले दिसतात. महिनाभरापुर्वीच जालना जिल्ह्यातील एका वेअर हाऊसला आग लागून कोट्यवधी रूपयांच्या कापसाची राख झाल्याचे दिसून आले. हे प्रकरण ताजे असतांनाच पुन्हा बीड तालुक्यातील जप्ती पारगाव येथील वेअर हाऊसला आग लागून कोट्यवधी रूपयांचे कापसाच्या गठानी राख झाल्या. या संदर्भात चोहीकडून एकच प्रश्‍न उपस्थित झाला की, इन्शुरन्स किती रूपयाचे आहे? आग अचानक कशी लागली? पोलीस प्रशासन आपल्या परीने तपास करत असले तरी नुकसान झालेला आकडा मोठा असल्याने तपासही चोहीकडून सुरू आहे. घटना घडल्यानंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साबळे यांनी या प्रकरणाचा तपास कसून सुरू केला. या संदर्भात पोलीस प्रशासनाने वखार महामंडळ, बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, महावितरण यांना पत्र व्यवहार करून या संदर्भात अहवाल मागितला असून यात अग्निशमन दलाचे अहवाल महत्त्वाचे ठरणार आहे. 1 मार्च रात्रीच्या सुमारास वेअर हाऊसला आग लागल्यानंतर आगीची माहिती औरंगाबादहून येणारे दिपक सुराणा यांनी कोटेचा यांना मोबाईलवरून दिली. त्यानंतर आग लागल्याची माहिती अग्निशमन दलापर्यंत पोहचली. या संदर्भात विविध चर्चा सुरू असतांना तसेच या प्रकरणी गुप्तचर यंत्रणा तपास करत असल्याचे समजल्यानंतर या प्रकरणाकडे दै.रिपोर्टरने विशेष लक्ष देवून विशेष माहिती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसे पाहिले तर वेअर हाऊसला आग लागल्यानंतर अनेक प्रश्‍न उपस्थित झाले. यात शिवसेनेचे कुंडलीक खांडे यांनी वेअर हाऊसमध्ये वीज कनेक्शन नव्हते तर आग लागली कशी? हा प्रश्‍न उपस्थित केला. या प्रश्‍नाच्या पुढे जावून दै.रिपोर्टरने जी माहिती समोर आणली ती माहिती खरोखरच धक्कादायक असून एवढ्या मोठ्या वेअर हाऊसला वीज कनेक्शन नसतांना वेअर हाऊसच्या चोही बाजूने बारीक तारेची बाँड्री असतांना नेमकी आग कोणत्या कारणाने लागली? या 61 कोटी आगीचे रहस्य आजही कायम आहे. घटनास्थळी जावून पाहणी केली असता चोहीकडे राख दिसून आली आणि राखेच्या वर वेअर हाऊसचे भले मोठे पत्र्याचे शेड मोठमोठ्या लोखंडी रडारासह कोसळलेले दिसून आले. अत्यंत भयंकर अवस्था त्या दिवशी असेल ज्या दिवशी आग लागली होती. आगीचे रौद्ररूप पाहून प्रत्यक्षदर्शी लोकांनी घटना सांगितली. त्यावेळेस अग्निशमन दलातील जवानांचे अभिनंदन करावेसे वाटले.
1 मार्च रात्री 11 च्या सुमारास दिपक सुराणा औरंगाबादहून बीडकडे येत असतांना अंदाजे 11.20 ते 11.25 च्या दरम्यान जप्ती पारगाव जवळ आले असता त्यांना कोटेचा यांच्या वेअर हाऊसला आग लागलेली दिसून आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ कोटेचा यांना आग लागल्याची माहिती दिली. या संदर्भात कोटेचा यांनी रात्री 11 वाजून 38 मिनिटाला अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती दिल्यानंतर अवघ्या दोन मिनिटात म्हणजे 11.40 मिनिटाला अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले. 20 मिनिटाचा प्रवास करून घटनास्थळी बंंब पोहचल्यानंतर एक ट्रिप पाणी फवारणी होताच पुर्ण वेअर हाऊसच्या भिंती चोही बाजूने कोसळू लागल्या. आगीची दहकता एवढी भयंकर होती की, 50 फुटापर्यंत त्याची ज्वाला जाणवत होती. अत्यंत भयंकर परिस्थिती निर्माण झाली. कोटेचा यांनी आपल्या फोनवरून औरंगाबाद येथील अग्निशमन दलाला कळवले. बीड अग्निशमन दलाचे धायतडक यांनी तात्काळ गेवराई व बंब उपलब्ध असलेल्या ठिकाणी फोन करून घटनेची गंभीरता सांगितली आणि जिल्ह्याच्या चोही बाजूने आग विझवण्यासाठी बंब धावू लागले. कशी बशी आग आटोक्यात आली. या आगीतून तब्बल 45 तास आगीतून धुर निघत होते, 40 ते 42 पाण्याचे बंब एकट्या बीड अग्निशमन दलाच्या जवानाने फवारले. गेवराई औरंगाबादहून आलेले बंब वेगळेच, अशा प्रकारे 50 तासानंतर आग आटोक्यात आली. पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखलल झालेले होते. त्यानंतर कोटेचा यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली. वेअर हाऊसमधून मिळालेल्या माहितीनुसार यात 58 कोटी 50 लाखाचे मटेरिअल व 2 कोटी 50 लाख रूपयाचे शेड असा 61 कोटी रूपयाचा या आगीत नुकसान झाले. सुरूवातीला या वेअर हाऊसचे इन्शुरन्स कमी असल्याची माहिती मिळाली. या संबंधित रिपोर्टरच्या प्रतिनिधीने संबंधितांना विचारना केली असता इन्शुरन्स असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत या आगीत पणन महासंघाच्या कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्या. 61 कोटी हे मोठे नुकसान असल्याने जिल्हा प्रशासनाने याकडे विशेष लक्ष दिले. या संदर्भात या आगीची कसून चौकशी सुरू असून रिपोर्टरच्या बातमीतून पोलीस प्रशासनाला व संबंधित ज्याचे नुकसान झाले त्यांना मोठा फायदा होणार यात काही शंका नाही. विशेेष म्हणजे रिपोर्टरच्या प्रतिनिधीने घटनास्थळी जावून विशेष पाहणी केली. यात घटनास्थळी अग्निशमन यंत्र एकत्रित तीन ठेवेलेले एका जागे आढळून आले. हे यंत्र पुर्ण जळाले असून नेमके अग्निशमन यंत्रच आहे का? समजून येत नाही.

पोलीसांकडून मिळालेली माहिती
या प्रकरणी कोटेचा यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली. यात कोटेचा यांनी अशी माहिती दिली की, दिपक सुराणा यांचा फोन आल्यानंतर तत्काळ वेअर हाऊसकडे रवाना झालो. त्यावेळी वेअर हाऊसमध्ये आग लागलेली हेाती. आगीचे एवढे रौद्र रूप होते की, वेअर हाऊसमधील सर्व 26 हजार 701 गठाणी जळून खाक झाल्या. यात अंदाजे 58 कोटी 50 लक्ष रूपयाचे व वेअर हाऊसचे शेअर 2 कोटी 50 लाखाचे असे 61 कोटी रूपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीसांनी वखार महामंडळाला पत्र देवून या वेअर हाऊसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा बसू शकतो का? तसेच ग्रामपंचायत व बांधकाम विभाग यांना पत्र देवून बांधकाम परवाना व ग्रामपंचायतची एनओसी या संदर्भात माहिती मागितली. अग्निशमन दलांकडून परवानगी घेण्यात आली का? तसेच वेअर हाऊसमध्ये लाईट कनेक्शन होते का? जर असेल तर ते सिंगल फेस की थ्री फेस अशी सर्व माहिती पोलीस गोळा करत आहेत. या संदर्भात पोलीसांनी वरील माहिती दिली असून या सर्व प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतरच या प्रकरणी गुन्हा दाखल होवू शकतो. या दृष्टीकोनातून पोलीस प्रशासन प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.

अग्निशामक दलाची एनओसी
जिनिंग असो की वेअर हाऊस या संबंधी संबंधितांनी आपल्या हद्दीतील अग्निशमन दलाकडून परवानगी व एनओसी घेणे गरजेचे आहे. या संबंधी रिपोर्टरच्या प्रतिनिधीने अग्निशमन दलाचे धायतडक यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता त्यांनी स्पष्ट सांगितले की, सदरील वेअर हाऊसने आमच्याकडून कोणतीही एनओसी घेतलेली नाही किंवा मागणीही केलेली नाही. या संदर्भात असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात की, ज्या अर्थी या वेअर हाऊसकडे एनओसी नाही तर विमा कंपनीला अशा वेअर हाऊसला विमा देता येतो का? तसेच सदरील कापसाच्या गठाणी पणन महासंघाच्या आहेत. या महासंघाच्या वरिष्ठांनी सर्व सहनिशा करून एवढ्या मोठ्या रक्कमेच्या कापसाच्या गठाणी ठेवल्या होत्या का? असे अनेक प्रश्‍न पुढे उपस्थित होणार आहे. तसेच घटनास्थळी नाईट वॉचमन होते संबंधित वॉचमनकडे मोबाईल होता का? मोबाईल जर असेल तर आग लागल्याची खबर सर्व प्रथम वॉचमनने मालकाला का दिली नाही? सुदैवाने दिपक सुराणा हे औरंगाबादहून आले आणि त्यांनी खबर दिली.

सुदैवाने स्फोट झाला नाही
रिपोर्टरच्या प्रतिनिधीने घटनास्थळी जावून पाहणी केली असता राखेच्या ठिकाणी मधोमध तीन सिलेंडर अंदाजे दीड फुट साईजचे दिसून आले. त्याची पाहणी केली असता प्रथमदर्शनी अग्निशमन यंत्र असल्याचे दिसूून येतात. या संबंधी अग्निशमन दलाचे अधिकारी यांच्याशी विचारना केली असता त्यांनी अशी माहिती दिली की, अग्निशमन यंत्र आगीत होरपळल्यानंतर त्याचा स्फोट होवू शकतो? ज्याअर्थी वेअर हाऊसची खांब आगीच्या टेंम्प्रेचरने लाल होवून कोलमडून पडली तर ते लोखंडी सिलेंडर अग्निशमन यंत्रासारखे दिसणारे घटनास्थळी मिळून आलेले सुदैवाने त्याचा स्फोट झाले नाही. भयानक दुर्घटना टळली यात काही शंका नाही.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!