Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeशेतीगारपीट, अवकाळीचा दुसर्‍या दिवशीही फटका गेवराई तालुक्यात 7 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान

गारपीट, अवकाळीचा दुसर्‍या दिवशीही फटका गेवराई तालुक्यात 7 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान


33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल तहसीलदारांनी पाठविला
गेवराई (रिपोर्टर):- मराठवाड्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांसह फळबागांना जबरदस्त फटका बसला. गेवराई तालुक्यातील तलवाडा, जातेगाव, चकलांबा यासह अन्य भागातील फळ पिकांचे व रब्बी पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील 7 हजार 247 हेक्टरमध्ये नुकसान झाले असून त्याचा अहवाल तहसीलदारांनी वरिष्ठांकडे पांठवला आहे.
दरवर्षी शेतकर्‍यांना कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागते. कधी अतिरिक्त पाऊस तर कधी गारपीट यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होते. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यता वादळी वार्‍यासह गारपीट होत आहे. यात फळ पिकांसह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तलवाडा, जातेगाव, चकलांबा यासह अन्य परिसरात रात्री आणि परवा गारपीट आणि पाऊस झाला. यामध्ये मोसंबी, आंबा, ज्वारी, गहू, हरभरा, टरबूज, खरबूज, भाजीपाला यासह अन्य शेती पिकांचे नुकसान झाले. तालुक्यात 2511 हेक्टर फळबागांचे तर 4 हजार 436 बागायती क्षेत्र असून 7 हजार 247 हेक्टर शेतीमधील पिकांचे नुकसान झाले. तालुक्यात 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून त्याचा अहवाल तहसीलदार सचिन खाडे यांनी वरिष्ठांकडे पाठवला आहे.

बीड जिल्ह्यात साडेसात हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात नुकसान
बीड जिल्ह्यात अवकाळी आणि गारपिटीमुळे 7 हजारापेक्षा जास्त हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. यात 250 हेक्टर ज्वारी, 4 हजार 825 गहू-हरभरा व इतर बागायत पिके तर 2 हजार 521 हेक्टरमधील फळ पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वारा व गारपिटीचा जनावरे आणि पशूपक्ष्यांनाही मोठा फटका बसला असून 6 मोठी जनावरे आणि 221 कोंबड्या व बकर्‍या दगावल्या आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!