Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड ४७० लाभार्थ्यांची सोडत पद्धतीने निवड

४७० लाभार्थ्यांची सोडत पद्धतीने निवड

बीड (रिपोर्टर):- गेल्या तीन महिन्यांपुर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशूसंवर्धन विभागाने दुधाळ जनावरांसाठीचे लाभार्थी निवडण्यासाठी अनुसूचित जाती-जमातीतील लोकांकडून अर्ज मागवले होते. यामध्ये ६ हजाराच्या आसपास लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र ज्या लाभार्थ्यांचे नाव डीआरडीमध्ये आहेत अशाच लाभार्थ्यांना यासाठी पात्र करून या पात्र लाभार्थ्यांतून सोडत पद्धतीने ४७० लाभार्थ्यांची काल निवड करण्यात आली.
या लाभार्थ्यांना दोन म्हशी किंवा दोन गायी देण्यात येणार आहेत ज्याची किंमत ८० हजार आहे. दोन म्हशी किंवा दोन गायी या ५० टक्के अनुदानावर मिळणार आहेत. लाभार्थ्यांनी निवड झाल्यानंतर कागदपत्रांची पुर्तता करून ४० हजार रुपये पंचायत समितीच्या कृषी आणि पशूसंवर्धन विभागात भरावयाचे आहेत. त्यानंतर या लाभार्थ्यांना महा डीबीडी प्रणालीद्वारे ८० हजार रुपये खात्यात जमा करण्यात येणार आहे. हा लाभार्थी त्याच्या पसंतीने दोन गायी किंवा दोन म्हशी घेईल. यासाठी बीड जिल्ह्यातील ३ हजार ६८१ लाभार्थी पात्र झाले होते. हे लाभार्थी बीड जिल्ह्यातील साठ जिल्हा परिषद गटातून निवडण्यात आलेल्या आहेत. काल ही निवड सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहामध्ये व्हिडिओ शुटिंग लावून करण्यात आली. त्यामुळे लवकरच ज्या ४७० लाभार्थ्यांना हे दुधाळ जनावर मिळणार आहेत. आज शेळी गटाच्या लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने होणार आहे.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...