बीड (रिपोर्टर) खेळता खेळता चौथ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना बीड शहरात घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरक्शा रईसोद्दीन कुरेशी (वय दीड वर्ष, रा. झमझम कॉलनी,(पान 7 वर)
कौसर चौक बीड) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. रईसोद्दीन झियाओद्दीन कुरेशी हे झमझम कॉलनीत किरायाणे राहतात. 23 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी साडेनऊ वाजता दरक्शा ही खेळत असताना चौथ्या मजल्यावरून खाली पडली. तिच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी काल दि. 7 डिसेंबर रोजी बीड शहर पोलिसात आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.