बीड (रिपोर्टर)दुचाकी लंपास करुन तीची विल्हेवाट लावणार्या एका दुचाकी चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या असून त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी जप्त केली आहे. तपासात त्याच्याकडून अन्य गुन्हे उघड होणाची पोलिसांना शक्यता आहे.
वडवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एकाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी वडवणी ठाण्यात गुरन. 216/2022 कलम 379 नुसार गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास सुरु असतांना आरोपी किरण संतराम गुंजाळ रा. मारुती मंदिर गांधीनगर बीड याने ती दुचाकी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने चोरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. त्याने अन्य इतर ठिकाणावरुन काही दुचाकी चोरल्या आहेत. हे पोलिस तपासात उघड होणार आहे.