बीडच्या न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल
बीड (रिपोर्टर) हातउसने घेतलेली रक्कम परत करण्यासाठी गटशिक्षणाधिकार्यांनी चेक दिला होता. सदरील हा चेक बँकेमध्ये वटला नसल्याने याबाबत संबंधिताने न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने गटशिक्षणा-धिकार्यास दोषी ठरवून 7 लाख रुपये दंड व तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
बबन केशव लहाने यांच्याकडून आरोपी अशोक विश्वनाथ पाटील यांनी हातउसने 5 लाख 75 हजार रुपये घेतले होते व मुदतीत हातउसने रक्कम मागितल्यानंतर आरोपीने फिर्यादीस एवढी रक्कम माझ्याकडे रोख स्वरुपात नसून माझ्या बँकेतील खात्यावर आहे, तुम्ही सदरील रक्कम धनादेशाद्वारे घ्यावी, असे म्हणून दि. 23.8.2017 रोजी फिर्यादीच्या हक्कामध्ये 5 लाख 75 हजार रुपयांचा धनादेश दिला. सदरचा धनादेश फिर्यादीने मुदतीत बँकेत वटवण्यासाठी जमा केला असता आरोपीच्या खात्यावर धनादेश वटण्याइतपत पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे सदरचा धनादेश अनादरीत झाला. त्यानंतर आरोपीने नोटीस पाठवूनही आरोपीने फिर्यादीस धनादेशाची रक्कम दिली नाही म्हणून फिर्यादीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बीड यांच्या न्यायालयामध्ये बबन विरुद्ध अशोक अशी फिर्याद दाखल केली. फिर्यादीच्या वतीने न्यायालयामध्ये साक्षी पुरावे दाखल केले परंतु प्रस्तुत (पान 7 वर)
प्रकरणातील आरोपीने बचाव घेतला की मी नोकरीस असून आज रोजी मी गटशिक्षणाधिकारी असल्यामुळे मला उसनवार रकमेची आवश्यकता नव्हती. त्यामुळे मी फिर्यादीकडून हातउसनी रक्कम घेतली नव्हती व धनादेशही दिला नव्हता. परंतु न्यायालयाने फिर्यादीच्या वतीने दाखल केलेले कागदोपत्री पुरावे ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.डी.चव्हाण मॅडम यांनी आरोपीस 7 लाख रुपये दंड व तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. प्रस्तुत प्रकरणामध्ये फिर्यादीच्या वतीने महत्वपुर्ण बाजू अॅड. शशीकांत सावंत यांनी मांडली. त्यांना अॅड. एस.एस. काळे, अॅड. पी.ए. ढाकणे, अॅड. एस.जी. तिपाले, अॅड. मुकुंद लोणकर, अॅड. अभिषेक बहीर यांनी सहकार्य केले.