Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडराशनवर आली मका आणि बाजरी

राशनवर आली मका आणि बाजरी

बीड (रिपोर्टर):- सर्वसामान्यांना अगदी कमी दरामध्ये गहू, तांदुळ उपलब्ध व्हावेत यासाठी रेशन दुकानाच्या माध्यमातून धान्याचा पुरवठा केला जात आहे. आता रेशन दुकानावर बाजरी आणि मधुमका मिळणार असून अनेक कार्ड धारकांना त्याचे वाटपही करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कार्यकाळात रेशन दुकानावर जास्तीत जास्त कोटा देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता इतर धान्य राशन दुकानावर उपलब्ध होत आहे.


रेशन दुकानाचा उद्देश म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना अगदी कमी दरात गहू, साखर, तांदुळ मिळावेत हा आहे. मात्र या रेशन दुकानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचेही समोर आलेले आहे. गेल्या वर्षापासून कोरोनाचा संसर्ग असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांची फरफट टाळण्यासाठी राशन दुकानावर जास्तीचा कोटा उपलब्ध करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गहू, तांदळासोबतच आता बाजरी आणि मका दुकानावर उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दुकानदारांना त्याचा पुरवठा करण्यात आला. अनेक कार्डधारकांना बाजरी आणि मका उपलब्ध झालेली आहे.

फेडरेशनने केली होती मका आणि बाजरीची खरेदी
शासनाने हमी भावावर धान्य खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दरवर्षी हमीभाव केंद्रावर धान्य खरेदी करण्यात येत आहे. गेल्या वर्षी बाजरी, मका खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आली होती. ही मका आणि बाजरी रेशन दुकानावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला. कारण शासनाकडे खरेदी केलेली मका आणि बाजरी मोठ्या प्रमाणावर पडून असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!