पोलीस येताच गुत्तेदार पळाले, कामकाज पुन्हा सुरू
बीड (रिपोर्टर):- मार्च एण्डच्या अनुषंगाने गुत्तेदार मंडळी गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात गर्दी करून आहेत. आज काही गुत्तेदार आणि कार्यालयीन कर्मचार्यात वादावादी झाली. यामुळे गुत्तेदारांनी चांगलाच गोंधळ घातला. याबाबत पोलीस प्रशासनाला कळविण्यात आले होते. पोलीस येताच गोंधळ घालणारे गुत्तेदार पळून गेले. गुत्तेदाराच्या गोंधळामुळे कर्मचार्यांनी कामकाज स्थगित केले होते मात्र पुन्हा कर्मचार्यांनी कामाला सुरुवात केली.
मार्च एण्ड असल्याने गुत्तेदार मंडळी तीन दिवसांपासून वित्त विभागात गर्दी करून आहेत. आपआपले बिले काढण्यासाठी गुत्तेदार सकाळपासूनच वित्त विभागात ठाण मांडून असतात. आज ३१ मार्च असल्याने वित्त विभागात अधिकच गर्दी उसळली होती. काही गुत्तेदार आणि कर्मचार्यांमध्ये वादावादी निर्माण झाल्याने गुत्तेदारांनी गोंधळ घातला होता. या गोंधळी गुत्तेदाराला वैतागून कर्मचार्यांनी कामकाज स्थगित करत पोलीस प्रशासनाला याबाबतची माहिती कळविली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर गोंधळी गुत्तेदारांनी पळ काढला. कामकाज काही वेळ स्थगित केल्यानंतर पुन्हा कर्मचार्यांनी कामकाजाला सुरुवात केली होती.