डवणी (रिपोर्टर):- राज्याचे तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलांनी महापुरुषांचे नाव घेत अवमान केला आहे.या प्रकरणी वडवणी येथे विविध समाजिक संघटनेच्या वतीने मंत्री पाटील यांच्या प्रतिमेला खेटरान फटकारलं तिव्र निषेध व्यक्त केला आहे.
सदरील आंदोलन बीड-परळी हायवेवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध समाजिक संघटनेच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहिर निषेध व्यक्त करत प्रतिमेला खेटरान फटकारलं आहे.यावेळी बी. एम.. पवार, भारतराव जगताप, युवराज शिंदे, दत्ता वाकसे, बाबासाहेब वाघमारे, वैजनाथ शिंदे, कृष्णा शिंदे, हनुमंत शिंदे, हरिभाऊ डोले, सचिन कसबे, एन के उजगरे, बाबासाहेब साळवे, अतुल राऊत, राणुजी डोंगरे, रावसाहेब राऊत, महारुद्र मुंडे, अशोक मुंडे, करने सर आदि जण उपस्थित होते.