Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाकेज प्रशासनाने बाजार हटवला एकच्या नंतर अनेकजण बसले होते बाजारात

केज प्रशासनाने बाजार हटवला एकच्या नंतर अनेकजण बसले होते बाजारात


केज (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते दुपारी १ वाजेपर्यंत शिथीलता देण्यात आली. त्यानुसार बाजारात व्यवहार करण्यात येत आहेत. असे असताना अनेक व्यापारी वेळेचे भान राखत नसल्याचे दिसून येत आहे. आज केजचा बाजार होता. बाजाराच्या दिवशी भाजी विक्रेत्यांनी भाजीचे स्टॉल लावले होते. दुपारी एकच्या नंतर सदरील स्टॉल आढळून आल्यानंतर या भाजी विक्रेत्यांना हटवत गल्ली बोळामध्ये भाजीपाला विकण्याच्या सूचना तहसीलदार मेंडके यांनी दिल्या.
बीड जिल्ह्यामध्ये दहा दिवसाचे लॉकडून करण्यात आले होते मात्र सर्वसामान्य नागरिकांची याच्यात फजित होत असल्याचे पाहत प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात बदल केला. सकाळी सात ते दुपारी एक या दरम्यान व्यवहार सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्यानंतर एक नंतरही काही व्यापारी आपली दुकाने बंद करत नसल्याचे दिसून येते. आज केजचा आठवडी बाजार होता. या बाजारा निमित्ताने अनेकांनी दुकाना लावला होता. बाजार बंद करण्याची वेळ होऊनही काहींनी व्यापार सुरुच ठेवला होता. तहसीलदार यांच्यासह इतर कर्मचार्‍यांनी सदरील व्यापार्‍यांना हटवत गल्लीबोळामध्ये भाजीपाला विक्री करण्याच्या सूचना दिल्या. नियमाचे योग्य पालन करण्याचे आवाहनही या वेळी तहसीलदारांनी केले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!