Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईखा. पवारांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

खा. पवारांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

युवक प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब यांनी केली सायबर क्राईमकडे तक्रार
मुंबई (रिपोर्टर):- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. या दरम्यान सोशल मीडियावर काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खा. शरद पवार यांना पोटाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या आजाराच्या कार्यकाळात काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी फेक अकाऊंटद्वारे पवारांबाबत आक्षेपार्ह मॅसेज फॉरवर्ड केले. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब यांनी सायबर क्राईम ब्रांचचे एसपी शिंद्रे यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार कलम 153 अ, 505 (2), 500, 504, 469, 499, 507, 35 नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. महेबूब यांच्या समवेत कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सुरज चव्हाण हे देखील उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!