महापुरुषांविरोधातल्या वक्तव्यांमुळे पंकजा मुंडेंचे मौन
परळी (रिपोर्टर) लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातूनच नव्हे तर राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती दिसून आली आहे. दुसरीकडे माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर यांच्या विरूध्द अपशब्द काढण्यात आले त्यामुळे सकाळी 11.30 ते 12 यादरम्यान त्यांनी मौन पाळले. माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जावून स्व.मुंडेंच्या समाधीशी नतमस्तक झाले.
लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर राज्यभरातून मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवत स्व.मुंडेंच्या समाधीशी नतमस्तक झाले. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन याठिकाणी करण्यात आले असून या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. यावेळी अनेकांनी स्व.मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. आज सकाळी गोपीनाथगडावर येवून मुंडे कुटूंबियांनी समाधीचे दर्शन घेतले. माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यात महापुरूषांबद्दल होत असलेल्या वक्तव्याबाबत सकाळी 11.30 ते 12 च्या दरम्यान कडक मौन वृत धारण केले. त्यांनीही मुंडे यांच्या समाधीशी दर्शन घेतले. गोपीनाथगडावर हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.










