बीड (रिपोर्टर) बीडचे भूमिपुत्र तथा आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे हे आरोग्य विभागाचे आयुक्त होते. मात्र राज्य सरकारने त्यांची बदली केली. मुंडे यांची बदली रद्द करण्यात यावी यासाठी बीड शहरामध्ये काही ठिकाणी होर्डिंग लावण्यात आली. मुंडे हे चांगले काम करत असताना त्यांची सातत्याने का बदली करण्यात येत? आरोग्य विभागात ते चांगले काम करत होते. आरोग्य विभागाची त्यांनी स्वच्छता सुरू केली होती. तोच शासनाने त्यांची बदली केली. सातत्याने मुंडे यांची बदली करणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यांची बदली रद्द करण्यासाठी कृती समितीच्यावतीने शहरात होर्डिंग लावण्यात आले.
तुकाराम मुंडे हे बीड येथील भुमिपूत्र आहेत. आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली. त्या त्या ठिकाणी त्यांचा पूर्ण कार्यकाळ होण्याआधीच त्यांची बदली करण्यात आली. त्यांची शिस्त आणि काम करण्याची पध्दत कडक असल्यामुळे राज्य सरकारला ते झोंबत आलेले आहे. काही महिन्यापूर्वी त्यांची आरोग्य आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आरोग्य विभागातील साफसफाई सुरू केली होती. त्यांच्या या कार्याचं अनेकांनी कौतुक देखील केले होते. पण त्यांची बदली करण्यात आली. मुंडे यांची बदली रद्द करावी यासाठी बीड शहरामध्ये काहीठिकाणी कृती समितीच्यावतीने होर्डिंग लावल्या आहेत.