Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना भयाण वास्तव, आंबाजोगाईत एकाच सरणावर कोरोना ने मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

भयाण वास्तव, आंबाजोगाईत एकाच सरणावर कोरोना ने मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

अंबाजोगाई -ऑनलाईन रिपोर्टर

जिल्हात कोरोनाचा वाढता समूहसंसर्ग रोखण्यासाठी मोठे प्रयत्न होत असले तरी कोरोना आटोक्यात येत नाही आज आंबाजोगाई येथील स्वराती कोविड सेंटर मधील कोरोना मुळे मृत्यू पावलेल्या आठ जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ येथील नगर पालिकेवर आली. ही घटना कोरोनाचे वास्तव सांगून जाते 

अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात 7 व लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण 8 कोविड मृतांवर नगर पालिका प्रशासनाकडून मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर अग्निडाग देण्यात आला. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने अंबाजोगाईत चिंता व्यक्त केली जात आहे. अंबाजोगाई येथे परळी, केज, धारूर, गंगाखेड, माजलगाव आदी तालुक्यातील रुग्ण कोरोनावरील उपचारासाठी येतात. कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण हे उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे विकार असे ६० ते ८० वयोगटातील असतात. हे रुग्ण अंगावर आजार काढून जास्त झाल्यानंतरच रुग्णालय गाठतात. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढू लागली आहे.


अंबाजोगाई तालुक्यात चार दिवसात पाचशेच्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. मात्र, काही नागरिक अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येते. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मृतांचे प्रमाण कमी असले तरी अंबाजोगाई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. सोमवारी शहरातील मंगळवार पेठ, भटगल्ली, बोरखेड (परळी), लोखणी दावारागाव, अंबलटेक, आपेगाव, मंगरूळ (माजलगाव) व धारूर या आठ गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला. या रुग्णावर मंगळवारी दुपारी पठाण मांडवा रस्त्यावरील पालिकने निर्माण केलेल्या कोविड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर आठ जणांना अग्निडाग देण्यात आला. यामध्ये एक महिला असून सर्व रुग्ण ६० वर्षापुढील आहेत.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....