• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

हे लोकशाहीला घातक

by Beed Reporter
December 20, 2022
Reading Time: 4 mins read
0
हे लोकशाहीला घातक
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp
लोकशाहीत मतदार हा राजा म्हणुन ओळखला जातो. लोकशाहीचा मुळ पायाच लोक आहेत. मतदार आपल्या मतांच्या संख्येवर कोणाला ही निवडून देवू शकतात, आणि कोणालाही पाडू शकतात. लोकशाहीत जात,पात, धर्म, पैसा पाहून मतदान करायचं नसतं. मतदान हे समोरचा व्यक्ती चांगला की वाईट हे ठरवून मतदान केले पाहिजे. चांगले लोक लोकशाहीत निवडून आले तरच लोकशाहीच अधिक बळकट होईल. नको असलेले लोक निवडून आल्यानंतर लोकशाहीला संपवण्यास वेळ लागणार नाही. आजचा विचार केला तर आपच्या लोकशाहीचा मार्ग नक्कीच कुठंतरी भरकटू लागला हे दिसून येवू लागलं. लोकशाही बाबत कितीही भाषणं दिली काय आणि किती लिहलं काय याचा तितका परिणाम होतांना दिसत नाही. लोकशाही बळकट कधी होईल हा नेहमीच प्रश्‍न उपस्थित होत आलेला आहे. लोक शिक्षीत झाले म्हणजे लोकशाही बळकट होते का? अनेक वेळा उच्च शिक्षीत लोक मोठया प्रमाणात भ्रष्टाचारात गुंतलेले दिसून येतात. पदाचा गैरवापर करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न होतो. प्रत्येक निवडणुका ह्या पैशाभोवती फिरू लागल्या. ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते लोक निवडून येणं अवघड आहे. एखादी घटना वगळली तर सर्रासपणे निवडणुकीत पैशाचा अमाप वापर होतो हे चिंताजनक आहे.
ग्रामपंचायतीचं स्वरुप
ग्रामपंचायतीचा मुळ उद्देश पुर्णंता बदलला. लोकांच्या विकासासाठी आणि गाव सक्षम करण्यासाठी ग्राम पंचायती सुरु करण्यात आल्या. जुन्या काळाचा थोडा इतिहास बघितला तर आश्‍चर्य वाटू लागतं. जुन्या काळातील लोक मर्जीचे होते, विचाराचे होते. आजच्या सारखे दलबदलू नव्हते. आज कोण कोणाचा असेल याचा पत्ताच लागत नाही. ग्रामपंचायतीला निधी भरपूर येवू लागला. केंद्र आणि राज्य सरकार गावांच्या विकासावर भर देत आहे. गावांना पैसे जास्त येवू लागले म्हणुन गाव पुढारी ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी वाट्टेल ते करु लागले. काही का असेना आपलं गाव ताब्यात असलं पाहिजे अशीच गाव पुढार्‍यांची अपेक्षा असते. गावाचे प्रश्‍न तितके अवघड नसतात, पण राजकीय पुढार्‍यामुळे गावांचे प्रश्‍न अधिकच जटील बनू लागले. कित्येक असे गावे आहेत त्या गावांना साधा कच्चा रस्ता नसतो. रस्त्याचे पैसे अनेक वेळा उचललेले असतात किंवा रस्ता व्हावा यासाठी सरपंच संबंधीत खात्याकडे कधीच पाठपुरावा करत नाही. विकास करायचा म्हटलं तर कामाचा पाठपुरावा करावा लागतो. एकदा निवडून आल्यानंतर पाच वर्ष अनेक सरपंच फिरकत नाही. दुसर्‍यांदा निवडणुक लढवण्याची काहींना गरज वाटत नाही. त्यामुळे पाच वर्ष ग्राम पंचायत ताब्यात घेवून त्यातून जितकं खाता येईल तितकं खाण्याचा जोरदार प्रयत्न होत असतो. ज्या गावाच्या शाळा चांगल्या. रस्ते चांगले, ते गाव नक्कीच विकासात पुढे म्हणावं लागेल. जि.प. शाळांचा निधी खाणारे पुढारी आपल्याकडे कमी नाहीत. निधी खाण्यावरुन मारामार्‍या होतात हे दुर्देव आहे.
इतकं फालतू राजकारण
परवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्याचा आज निकाल लागला. निवडणुकीतील अनुभव प्रचंड वाईट असतात. गावातील राजकारणात सर्वसामान्यांचा जास्त प्रमाणात बळी जात असतो. प्रस्थापीत पुढारी निवडणुकीत वेगवेगळे अस्त्र काढत असतात. मग ते अस्त्र जातीचं असेल, दंडेलशाहीचा असेल किंवा पैशाचं असतं. सरपंच पद हे जनतेतून असल्यामुळे कोणालाही सरपंच पद हवं असतं. सदस्य होण्यास कुणाला इंट्रेस नसतो. निवडणुका घोेषीत झाल्यापासून ते मतदानापर्यंत पॅनलप्रमुख बेजार असतात. पैशाचा अमाप वापर केला जात असता. कित्येंना लाखो रुपयाला चंदन लागतं, त्याला निवडणुका किती वाईट असतात हे निकाल लागल्यावर कळत असतं. पराभूत झालेले पाच वर्ष निवडणुकीचं नाव घेत नसतात. कित्येकांनी निवडणुकीसाठी जमिनी, प्लॉट, सोने विकून निवडणुकीत खर्च केला. निवडणुकातील तत्वाला मुठमाती देण्यात आली. भाऊबंदकी निवडणुकी पायी समोरासमोर येत असते. मतदारांना मतदान करता वेळी अनेक प्रश्‍न पडत असतात, मतदार दबावात मतदानाचा धर्म निभावत असतो. विधानसभा निवडणुका सोप्या पण ग्रामपंचायती निवडणुका प्रचंड अवघड असतात. पॅनलप्रमुख व उमेदवारांना मतासाठी मतदारांच्या समजुती काढता, काढता. तोंडाला फेस येत असतो. मतदान कोणाला होईल याचा शेवट पर्यंत भरोसा नसतो.
पक्षावर नव्हे, व्यक्तीभोवती निवडणुका
बडे नेते आणि ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचा संबंध नसतो. ह्या निवडणुका स्थानिकवर अवलंबून असतात. निवडून आल्यानंतर अनेक जण विविध पक्षाच्या पुढार्‍यांच्या दारात माथा टेकवत असतात. निवडून आल्यानंतर कोणी कोणाकडे जावं हा ज्याचा, त्याचा प्रश्‍न असतो. निवडणुकीत कुठल्या ही पक्षाला पाहून किंवा जिल्हा, तालुक्याच्या नेत्याला पाहून मतदान होतचं नाही. गावच्या राजकारणानूसार मतदान होत असतं. काही बोटावर मोजण्या इतक्या ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या. जास्तीत, जास्त ग्रामपंचायती बिनविरोध निघाव्यात अशीच प्रशासनाची अपेक्षा असते. मात्र तसं होत नाही. लोकांना निवडणुकीत जास्त उत्साह असतो. जिरवा, जिरवीची भाषा जास्त होत असते. त्यामुळे गाव पुढारी झुंज खेळण्यातच स्वत:ला धान्य समजत असतात. ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निघल्या आहेत. त्यातील काहींवर नक्कीच बोली लावली गेली असणार. गाव विकणं हे धोक्याचं असतं. विकासासाठी ग्रामपंचायती बिनविरोध काढणं हे चांगलं लक्षण आहे. विकासासाठी किती गावकर्‍यांनी ग्रामपंचायती बिनविरोध काढल्या? ज्या बड्या ग्रामपंचायती आहेत. त्यात तालुक्याच्या पुढार्‍यांनी लक्ष घातलं होतं. बडया पुढार्‍यांना आपली ग्रामपंचायत बिनविरोध काढता येत नाही हे आश्यर्च म्हणावं लागेल. राज्यात काही नामंकीत पुढार्‍यांच्या गावात निवडणुका झाल्या. त्यात प्रचंड चुरस पाहावयास मिळाली. कोणाची हार आणि कोणाची जित झाली. निवडणुका झाल्यानंतर कार्यकर्ते शुध्दीत राहत नसतात. त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणावरुन कुरापत काढावी वाटत असते. मतदान झालं नाही म्हणुन काही भांडणं उकरुन काढतात. मतदान कमी झाले म्हणुन सुध्दा भांडणारे कमी नाहीत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काही ठिकाणी रक्ताचा सडा पडत असतो. निवडणुकीसाठी रक्त सांडत असेल तर त्या निवडणुकीला अर्थ राहत नाही. निवडणुका पार पडल्यानंतर आप, आपसातील वाद मिटवायचे असतात. मुळात लोकशाहीचं तत्व समोर ठेवून निवडणुकीला समोरे जायला हवं!
मटन, दारुवर जोर
निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवावे लागते. मतदारांना खुष केले नाही तर आपल्याला मतदान होणार नाही हे अनेक उमेदवारांच्या डोक्यात चांगलं फिट बसलेलं असतं. निवडणुका घोषीत होण्याच्या आधीच पासूनच काही भावी उमेदवार निवडणुकीसाठी पैसे राखीव काढून ठेवत असतात. निवडणुकीच्या दरम्यान, गावाकडे अनेक ठिकाणी फक्त आणि फक्त निवडणुकीच्या चर्चा होत असतात. ज्यांना राजकारणाचा धंद आहे, ते लोक या गावात काय चाललं, त्या गावात काय चाललं अशी विचारपुस करत असतात. हॉटेल, टपर्‍या, धाब्यावर पंधरा दिवस निवडणुकी शिवाय दुसरा विषयच नव्हता. गावत ही ज्याच्या, त्याच्या तोंडात फक्त निवडणुकीचीच चर्चा पाहावयास मिळत होती, राजकारण लोकांच्या अंगात भिनलं. लोकांना निवडणुकीपुढे झोपा येईल, जेवन सुध्दा जात नाही. एका ठिकाणी निवडणुकीची चर्चा ऐकली असता. एकाच दिवशी एका गावात तीस ते चाळीस बकर्‍यांचा ढवारा केला असल्याचे एक व्यक्ती सांगता होता. मटन तर आहेच, त्या सोबत दारुचा महापूर वाहत होता. जवळपास प्रत्येक गावात मटन, दारुचा सर्रासपणे वापर करण्यात आला. व्यसन लागू नये म्हणुन अनेक प्रयत्न केले जात असतात. निवडणुकीतून किती लोक व्यसनाधीन होतात याचा विचार केला जात नाही. एकदा फुकट खायला, दारु प्यायला भेटली की, लोकांना तशीच सवय लागून जाते. त्यातून लोक जास्तीत जास्त व्यसनाधीन होत असतात. निवडणुका ह्या लोकांना उध्दवस्त करणार्‍या ठरु लागल्या.
शपथा खावून मत विकलं?
मतांची सौदेबाजी होवू लागली. मतदान काय असतं. याचा ज्ञान बहुतांा लोकांना नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण लोकशाहीची व्याख्या लोकाच्या डोक्यात बसली नाही. एका मतामुळे गत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक उमेदवार पडलेले आहेत. एक, एक मत पॅनलप्रमुखासाठी महत्वाचं होतं. गावात किती मतदान आहे. त्या नूसार हिशोब जुळवण्याचं काम केलं जात असतं. सध्या राज्यात उस तोडणीचा हंमाम सुरु आहे. बीड जिल्हयातील चार लाखापेक्षा जास्त मजुर ऊस तोडण्यासाठी गेलेले आहेत. मजुरांना परत आणण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यात आले. मजूर मतदानासाठी सहज आले नाहीत. बहुतांश मजुरासाठी पैसे खर्च करावे लागले, तेव्हा ते आले. येण्या, जाण्याचं भाडं आणि वरुन मतदानासाठी पैसे मोजावे लागले तेव्हा कुठं मजुरांनी फड सोडला. शहराच्या ठिकाणी राहणारे मतदार ही मोठ्या संख्येने आले होते. काही ग्रामपंचायतीत काट्याची टक्कर झाली. किती घेता, आणि मतदान करता? इथपर्यंत व्यवहार झाला. पैसे देतांना पॅनलप्रमुख संबंधीतांना शपथा खाण्यास भाग पाडत होते आणि नंतरच आर्थिक व्यवहार करत होते. एकुणच सगळ्या परस्थितीचा विचार करता, मतदार राजा असा असू शकतो? आली संधी तर घ्या हात धुवून अशी काहींची भुमिका असते. पैशासाठी मतांची बोली लावून लोकशाहीचा एक प्रकारे लिलावच केला जात आहे. अशा पध्दतीने निवडणुका होणं हे लोकशाहीला घातक आहे. मतदार राजा जो पर्यंत सुज्ञ होत नाही. तो पर्यंत निवडणुकीचा कारभार असाच सुरु राहणार. निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत आत्मचिंतन होणं गरजेचं आहे!
Previous Post

कुठे हसू कुठे आँसू; परळीत धनंजय मुंडे, बीडमध्ये क्षीरसागरच, गेवराईत अमरसिंह पंडितांचा दबदबा, माजलगावात दादागिरी; नाथ्रा धनंजय मुंडेंचेच

Next Post

भुजबळांनी चंद्रकांतदादांची अडचण केली; फडणवीस सावरायला उठले, पण अजितदादांनी निकाल लावला!

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
मराठवाड्यासह विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अधिवेशन तीन आठवडे घ्यावं; विरोधी पक्षनेते अजित पवारांची मागणी

भुजबळांनी चंद्रकांतदादांची अडचण केली; फडणवीस सावरायला उठले, पण अजितदादांनी निकाल लावला!

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?