बीड (रिपोर्टर):- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूंचे प्रमाणही वाढत आहे. काल एकाच दिवशी दहा जणांचा मृत्यू झाला होता. आज दुपारपर्यंत पुन्हा चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यामध्ये अंबाजोगाईचे तीन पुरुष आणि परळीच्या एका महिलेचा समावेश आहे.
रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter
कोरोनाचा कहर थांबता थांबत नसल्याचे येणार्या आकडेवारीवरून दिसत आहे. काल रेकॉर्डब्रेक 716 पॉझिटिव्ह तर 10 बाधितांचा मृत्यू झाला होता. आज दुपारी दीड वाजेपर्यंत तपासणी अहवाल प्राप्त झालेला नव्हता.