बीड (रिपोर्टर):- केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असून स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत. कोरोनाच्या काळातही लोक सर्रासपणे एकत्र येऊन तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरडेवाडी शिवारात काल तिर्रट नावाचा जुगार खेळताना 10 जुगारी एसपींच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात केज पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल
https://t.me/beedreporter
कोरोनाच्या दुसर्या लाटेने बीड जिल्ह्यात कहर केला असून विविध उपाययोजना शासन-प्रशासनाकडून केल्या जात आहेत. त्यातच जमावबंदी आदेश लागू असतानाही जुगारी सर्रासपणे एकत्र येत तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्गही वाढत आहे. स्थानिक पोलीस अशाच जुगार्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगार सुरू असल्याची माहिती एसपींचे पथकप्रमुख एपीआय विलास हजारे यांना मिळताच त्यांनी काल केज तालुक्यातील कोरडेवाडी शिवारातील सुदाम भागुजी वरपे यांच्या शेतात धाड टाकली असता तेथे 9 जुगारी तिर्रट खेळताना आढळून आले. त्यामध्ये बापुराव राजाराम यादव (कोरडेवाडी), बाळासाहेब गणपती राख (कोरडेवाडी), महेंद्र सोपान यादव (कोरडेवाडी), शिवाजी सुदाम वरपे (कोरडेवाडी), गोविंद नवनाथ आव्हाड (देवगाव), दत्तात्रय निवृत्ती कुटे (विडा ता. केज), नारायण केरबा वाघमारे (रा. विडा), भगवान सीताराम कोरडे (कोरडेवाडी), सुग्रीव भाऊ सांगळे (आंधळेवाडी), सुदाम भागुजी वरपे (कोरडेवाडी) या नऊ जणांना पोलीसांनी जुगार खेळताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व नगदी 52 हजार 750, मोबाईल, 58 हजार रुपये व मोटारसायकली असा एकूण 2 लाख 50 हजार 750 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.