बीड (रिपोर्टर) मांजरसुंबा घाटातील एका हॉटेलच्या परिसरात चोरट्या मोबाईल चोरल्याची घटना घडली होती. हा मोबाईल चोरताना तृतीयपंथियाने चोरट्याला पाहिलं आणि पकडून ठेवलं. याचा राग मनात धरून चोरट्याने इतर साथीदारांच्या मदतीने चार-पाच तृतीयपंथियांना बेदम मारहाण केली. तृतियपंथियांनी चोरट्याला पकडून जिल्हा रुग्णालयात आणले. त्याठिकाणी रात्रभर एकच राडा सुरू होता.
मांजरसुंबा घाटातील एका हॉटेलच्या बाजुला काही तृतीयपंथी होते. त्यावेळी एका चोरट्याने उभ्या असलेल्या ट्रकमधून मोबाईल चोरला. हे तृतीयपंथीयांनी पाहून त्याला पकडून ठेवले. त्यानंतर त्या चोरट्याने आपले इतर साथीदार बोलावून तृतीयपंथीयांना बेदम मारहाण केली. रात्री उशीरा तृतीयपंथीयांनी चोरट्याला धरून जिल्हा रुग्णालयात आणले. त्याठिकाणी इतर तृतीयपंथीही जमा झाले होते. चोरट्याने त्यांची माफी मागून तिथे प्रकरण मिटवल्याचे समजते मात्र या प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालयात रात्री अकरा ते चारपर्यंत गोंधळ सुरू होता. यामुळे येथील रुग्ण आणि नातेवाईकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.