नागपूर (रिपोर्टर) राजीनामा द्या, राजीनामा द्या.. भ्रष्ट मंत्री राजीनामा द्या, विदर्भ हैराण, सत्ताधारी खातो गायरान, खाऊन खाऊन पन्नास खोके.. माजले बोके, माजले बोके अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधार्यांविरोधात जोरदार निदर्शनं केली. काल संत्री तर आज खाली खोके हातात घेऊन विरोधकांनी हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. खोकेवाल्यांची हकालपट्टी करा.. म्हणत सत्ताधार्यांना धारेवर धरले. आमदारांनी हातात टेलीबर्डचे बोके आणि रिकामे खोके हातात घेऊन सरकारचा निषेध केला.
विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला. विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसर्या आठवड्यातील चौथ्या दिवसाचं कामकाज सुरु झालं आहे. आजही विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधार्यांविरोधात आक्रमक सूर आळवला.