नेकनुर( रिपोर्टर)बीड तालुक्यातील लिंबागणेश परीसरात आठवड्याभरात मध्यरात्रीतुन मोठमोठ्या वाहनातून डीझेल चोरी जाण्याच्या प्रकारात वाढ झाली असून नेकनुर पोलीस प्रशासनातील आधिकारी मात्र साधा पंचनामा करण्याची तसदी सुद्धा घेईना झालेत त्यामुळे नागरीकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
गेल्या आठवडाभरात लिंबागणेश येथील अजीम सय्यद यांच्या कांदा वाहतूक करणा-या माल वाहतुक करणा-या ट्रक (वाहन क्रमांक एम. एच.16 -एई-8886) वाहनातुन आठवडाभरात दोन वेळा एकदा 30 हजार रूपयांचे राजयोग धाबा याठीकाणी गाडी रात्री मुक्कामी असताना चोरीस गेले
याचवेळी जामखेड येथील ट्रकचे 20 हजार रूपयांचे डिझेल चोरीला गेले याविषयी नेकनुर पोलीस प्रशासनातील आधिका-यांना कल्पना देऊन सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही त्यानंतर परवा रात्री गावात मारोती मंदिरासमोर उभ्या असलेल्या सय्यद अजीम यांच्या ट्रकमधील 10 हजार रूपयांचे डिझेल चोरीला गेले. कालमध्यरात्री तुळशीराम काटकर यांच्या धाब्यावर मध्यरात्री दीड वाजता डिझेल चोरीचा प्रयत्न तुळशीराम यांना जाग आल्यामुळे फसला.चोर पळुन गेले.
सपोनि हजारे यांना पंचनामा करायला वेळ नाही
गेल्या आठवडाभरात लिंबागणेश येथील डीझेल चोरी प्रकरणात 2 वेळा सपोनि नेकनुर पोलीस स्टेशन विलास हजारे यांना फोनवरून कल्पना दिली मात्र आज येतो,उद्या येतो म्हणत हजारे यांनी वेळ मारून नेली. नेकनुर पोलीस प्रशासनातील आधिका-यांना साधा पंचनामा करण्यासाठी सुद्धा वेळ नाही असंच एकंदरीतच त्यांच्या कार्यपद्धतीवर दिसुन येत
असून याबद्दल नागरीकांमध्ये नाराजी आहे.