Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनाcorona update-बीड तालुक्यता सर्वाधिक तर जिल्ह्यात 1297 बाधित

corona update-बीड तालुक्यता सर्वाधिक तर जिल्ह्यात 1297 बाधित

बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोना समुह संसर्ग रोखण्याचे नाव घेत नसून आज पुन्हा बाधितांची संख्या तब्बल 1297 वर जावून पोहचली असून काल 4 हजार 397 संशयितांचे नमुणे तपासणीसाठी पाठवले असता त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाधित रूग्ण आढळून आले.

बीड, अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा समुह संसर्ग झपाट्याने वाढत असून गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात बाधितांचा आकडा हजाराच्या पुढे रोज वाढतांना दिसून येत आहे. काल जिल्ह्यातून 4 हजार 397 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता आज दुपारी 4 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार 3 हजार 100 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले तर 1 हजार 297 जण कोरोना बाधित आढळून आले.

सर्वाधिक अंबाजोगाई तालुक्यात 206, आष्टी 138, बीड 313, धारूर 52, गेवराई 84, केज 171, माजलगाव 44, परळी 85, पाटोदा 77, शिरूर 82, वडवणी तालुक्यता 45 बाधितांचा समावेश आहे. आज बीड, अंबाजोगाई, केज, आष्टी या ठिकाणी सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!