चौसाळा (रिपोर्टर)ः- महापुरूषांचे बॅनर फाडणार्या अज्ञात समाज कंटकाविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाच्यावतीने चौासाळा बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व व्यापार्यांनी बंद मध्ये सहभाग घेतला होता.
छत्रपती संभाजी महाराज चौकात संभाजी महाराजांचे बॅनर लावण्यात आले होते. सदरील हे बॅनर अज्ञात समाज कंटकाने फाडल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शंभू प्रेमीमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाच्यावतीने आज घटनेच्या निषेधार्थ चौसाळा बंद ठेवण्यात आला होता. उपजिल्हा प्रमुख प्रदिप जोगदंड यांनी बंदची हाक दिली होती. या बंद मध्ये सर्व व्यापार्यांनी सहभाग घेतला होता. दोषी विरोधात कारवाई करण्यात यावी अशी माणगी करण्यात आली आहे.