बीड (रिपोर्टर) दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बीड जिल्ह्यात बारावीचे 38 हजार 929 तर दहावीचे 41 हजार 521 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
21 फेब्रुवारी ते 21 मार्च या दरम्यान बारावीची तर 2 ते 25 मार्च या कालावदीत दहावीची परीक्षा होणार आहे. बीड जिल्ह्यात बारावीचे 101 परीक्षा केंद्र आहेत. 15 परीरक्षक केंद्र असून 38 हजार 921 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीचे 156 परीक्षा केंद्र तर 15 परीरक्षक केंद्र असून 41 हजार 521 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.