Friday, October 22, 2021
No menu items!
HomeUncategorizedमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला काय सांगितले.. वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला काय सांगितले.. वाचा

राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सर्व हुतात्म्यांना अभिवादन करुन संबोधनाची सुरुवात केली. ते म्हणाले की, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कामगार आणि शेतकरी दोन्ही उतरले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सर्व हुतात्म्यांना मानाचा मुजरा.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांना अभिवादन करतो, मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणाऱ्या सर्व वीरांना वंदन, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन दोन्ही एकाच दिवशी, शेतकरी आणि कामगार या दोघांचं मोलाचं योगदान महाराष्ट्र निर्मितीत आहे. मागील वर्षी 1 मे रोजी लॉकडाऊन होता आणि यावर्षी देखील काही वेगळी परिस्थिती नाही. हे आपल्यामागे काय लागलंय कळत नाही. सध्याचा जो काळ आहे हा निघून जाईल, पुढे सोन्याची झळाळी निश्चित येईल.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सध्या राज्यात लॉकडाऊन सदृश स्थिती आहे. कालच उच्च न्यायालयाने आत्ता असलेल्या निर्बंधांपेक्षा कडक निर्बंध लादण्याची गरज आहे का ? असे विचारले आहे. मला वाटतं तशी गरज वाटत असली तरी निर्बंध लादले जाणार नाही. माझे महाष्ट्रातील नागरिक नियम पाळतील. रुग्णवाढ कमी झालीय असे नाही, पण ज्या वेगाने वाढत होती ती आता स्थिरावली आहे. बंधने लावणे सोपे आहे, पण पाळणे अवघड आहे. मी गेल्यावेळी म्हटलं होतं, आपली रोजी मंदावेल पण मी रोटी थांबू देणार नाही

आपण संयम दाखवला आणि मी काही निर्बंध लादले. त्या दिवशी मलाही सांगायला जड गेले होते, पण त्याची गरज होती. तुम्हीही माझे नेहमी प्रमाणे ऐकले. जी रुग्णवाढ साडेनऊ लाखांपर्यंत जाऊ शकली असती ती आपण साडेचार पाच लाखांपर्यंत रोखली आहे. मी जे बोललो ते आपण ऐकलं, निर्बंध घालणे अवघड होते. पण जी शक्यता होती. ती रुग्णसंख्या आपण सहा ते साडेसहा लाखांपर्यंत स्थिरावून ठेवली आहे. राज्यासाठी गरजेच असेल तर मी कुणाचही अनुकरण करायला तयार आहे. गेल्या वर्षी दोन प्रयोगशाळा होत्या,आता सहाशेच्या आसपास प्रयोग शाळा आहेत. लॉकडाऊन लावलंय पण हातला लॉक लावून बसलेलो नाही

आजच आपण ज्या पद्धतीने संयम दाखवत आहोत, तो जर दाखवला असता तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. अजूनही आपल्याला बंधनं पाळणं गरजेचं आहे. मगील वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्यावेळी आपल्या महाराष्ट्रात फक्त दोन लॅब होत्या. आज 29 एप्रिल 2021 ला सध्या राज्याता 609 प्रयोगशाळा सुरु झाल्या आहेत. आपण चाचणीची क्षमता वाढवत आहोत. आपण चाचण्या तीन लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण काही जंबो कोविड सेंटर उभारले आहेत, असे ते म्हणाले.

राज्यात जूनमध्ये तीन लाख 36 हजार बेड होते, आता 4 लाख 31 हजार आहेत. राज्यात आयसीयू बेड्स 11882 होते आता 28900 बेड्स आहेत. जूनला 3744 वेंटिलेटर्स होते. सध्या 11 हजार व्हेंटीलेटर्स आहेत. आपण बेड वाढवू शकतो. पण डॉक्टर,नर्सेस वाठवणे कठीण आहे. विचार केल्यावर एसीमध्ये बसूनसुद्धा घाम फुटतो. रुग्णांमध्ये वाढ झाली तर परिस्थिती अवघड होण्याची शक्यता आहे. सध्या रेमडेसिव्हीरची मागणी वाढली आहे. आपल्याला 50 हजार इंजेक्शनची गरज आहे. केंद्राने ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या वाटपाचे नियोजन आपल्याकडे घेतले आहे. सुरुवातीला केंद्राने 26 हजारच्या आसपास इंजेक्शन मिळतील अशी व्यवस्था केली होती. नंतर मी मागणी केल्यानंतर आता केंद्राने 43 हजार इंजेक्शन देण्याचे मान्य केले आहे. सध्या 35 हजाराच्या आसपास आपल्याला रोज इंजेक्शन मिळत आहेत. गरज नसताना रेमडेसिव्हीर वापरू नका. गरज नसताना हे इंजेक्शन वापरले तर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे गरज असेल तर रेमडेसिव्हीरचा वापर करावा.

गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हा, तालुक्यात रुग्णालयात ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटची नर्मिती करण्याचे सांगितले आहे. मात्र, नव्याने प्लांट सुर करायचे असेल तर त्याला काही वेळ लागतोच. 15 ते 20 दिवस लागतील.कोविडची तिसरी लाट आली तर ऑक्सिनज कमी पडणार नाही. तशी तयारी आपण केली आहे. मला खात्री आहे तशी वेळ येणार नाही. लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करणे सोपे असते. मात्र,गॅस ऑक्सिजनची वाहतूक करणे अवघड आहे. त्यामुळे गॅस ऑक्सिजन प्लांटच्या ठिकाणी आपण कोविड सेंटर्स उभारणार आहोत.

Most Popular

error: Content is protected !!