Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीड, अंबाजोगाईत सडकफिर्‍यांच्या अँटीजेन चाचण्या

बीड, अंबाजोगाईत सडकफिर्‍यांच्या अँटीजेन चाचण्या


बीड शहरात दहा ठिकाणी होत आहेत तपासण्या, अकरानंतर बाहेर फिरणार्‍या अनेक वाहनधारकांना दंड, काहींच्या अँटीजेन चाचण्या,
अंबाजोगाई शहरातही प्रशासनाने उघडली दंडात्मक कारवाईची मोहीम, दुपारी एक वाजेपर्यंत २० पेक्षा जास्त कोरोना बाधित सापडले

बीड/अंबाजोगाई (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनचे निर्देश असतानाही लोक रस्त्यावर फिरत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आजपासून शहरात विनाकारण फिरणार्‍या सडकफिर्‍यांविरोधात मोहीम उघडत दंडात्मक कारवाईसह त्यांच्या अँटीजेन टेस्टला सुरुवात केली आहे. शहरातल्या विविध भागात पोलीसांसह अँटीजेन तपासणी करणार्‍या पथकाला थांबवून ही कारवाई केली जात असून दुपारपर्यंत अनेक वाहन धारकांबरोबर अन्य सडकफिर्‍यांविरोधात दंडात्मक कारवाई करत काहींच्या अँटीजेन चाचण्या केल्या आहेत. बीड शहरापाठोपाठ अंबाजोगाईतही ही मोहीम उघडल्याने विनाकारण फिरणार्‍यांवर आळा बसण्याची शक्यता आहे.
बीड, अंबाजोगाई या दोन शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा समुहसंसर्ग वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनचेि निर्देश असताना लोक मात्र ऐकायला तयार नाहीत, ते सातत्याने रस्त्यावर फिरताना दिसून येतात. आता बीड जिल्हा प्रशासनाने रस्त्यावर फिरणार्‍या सडकफिर्‍यांविरोधात मोहीम उडली असून बीड शहरातील शिवाजी चौक, आंबेडकर चौकसह शहरातल्या अन्य प्रमुख ठिकाणी पोलीसांच्या उपस्थितीत विनाकारण बाहेर फिरणार्‍यांच्या अँटीजेन चाचण्या सुरू केल्या आहेत. सकाळी सात ते अकरा लॉकडाऊन शिथिलता काळात मोठ्या प्रमाणावर लोक अकरा वाजल्यानंतरही बाहेर फिरणार्‍या लोकांविरोधात पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला. अनेक ठिकाणी वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करत काहींच्या अँटीजेन चाचण्या केल्या बाहेर पडल्यानंतर अँटीजेन चाचण्या केल्या जातात या दृष्टीने विनाकारण फिरणार्‍या सडकफिर्‍यांवर काही काळ बंधन लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अंबाजोगाई शहरातही अशीच कारवाई पोलीस आणि आरोग्य विभागाने सुरू केली आहे.
दुपारपर्यंत २१५
जणांच्या चाचण्या

लॉकडाऊन असताना विनाकारण फिरणार्‍या लोकांविरोधात पोलीस प्रशासनाने आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली असून दंडात्मक कारवाईसह रस्त्यावरच अँटीजेन टेस्ट आजपासून सुरू केल्याने शहरातल्या किमान १० ठिकाणी या कारवाईत २१५ जणांच्या अँटीजेन चाचण्या केल्या त्यात २० पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात येते. मात्र आरोग्य विभागाकडून दुपारी वाजेपर्यंत ८ ठिकाणांहून १२ रुग्ण पॉझिटिव्ह मिळून आले.

Most Popular

error: Content is protected !!