Friday, October 22, 2021
No menu items!
Homeक्राईमधक्कादायक...! चक्क एसीबीचे अधीकारीच करतात लाचेची मागणी ,तलाठी आंधळे यांच्या तक्रारीने खळबळ...

धक्कादायक…! चक्क एसीबीचे अधीकारीच करतात लाचेची मागणी ,तलाठी आंधळे यांच्या तक्रारीने खळबळ राज्याच्या एसीबीला हादरा

 **
——————————-
 *बीड एसीबीचे पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांची तडकाफडकी उचलबांगडी*
———————–
गेवराई (रिपोर्टर) सज्जा खळेगाव येथे कार्यरत असतांना आपल्यावर ऑनलाईन सातबा-यांची शासकीय 240/- रु.शुल्कास लाचेत रूपांतर करून खोटा ट्रॅप केला व त्या गुन्ह्यात मदत करतो व पंचनामा देतो असे सांगून खुद्द बीड एसीबीचे पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांनी 1 लाख रु. मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. एक तर खोटी कारवाई केली आणि पुन्हा एक लाख रू.ची मागणी केल्यामुळे संबंधित प्रकरणातील तलाठी आंधळे यांनी थेट पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे तक्रार करून पोलीस निरीक्षक पाडवी यांच्यावरच ट्रॅप लावण्याची मागणी केली आहे. दरम्यान एसीबीचे प्रमुखांनी काहीच कारवाई न करता पाडवी यांना याबाबत माहिती दिली व पुढे पुरावा नाही असे कारण देऊन प्रकरण दाबले तरीही आंधळे यांनी संबंधितांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली असून या प्रकरणी पोलीस निरीक्षक पाडवी यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
      या बाबत सविस्तर माहीती अशी की , दुसर्‍या प्रकरणात गेवराई जि.प. अंतर्गत बांधकाम विभागातील पाणी पुरवठा विभागातील अभीयंता शेख समद यांना एक हजाराची लाच घेताना बीड एसीबी चे पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांनी कारवाई केली होती. त्यानंतर त्यांचे भाऊ शेख जमालोद्दीन यांना तुमच्या गुन्ह्यात व दोषारोपत्र यात मदत करतो असे सांगून पोलीस निरीक्षक पाडवी व त्यांच्या सहकार्‍याने दोन लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ही रक्कम 50 हजार रु. ठरली आणि याबाबतची व्हॉईस रेकॉर्डिंग हॉयरल झाली.
        त्यानंतर एसीबीचे पोलीस महासंचालक यांच्याकडे शेख जमालोद्दीन व खुद्द तलाठी आंधळे यांनी पुराव्यानिशी तक्रार सादर करून गुन्हा नोंद ची मागणी केली. आंधळे यांच्या तक्रारीत असे म्हटले आहे की एसीबी विभाग समाजात बदनामी होईल. या भीतीने स्वतःच्या अधिकार्‍यांवर ट्रॅप लावत नाही त्यांच्या पूर्वीच्या व्यक्तिगत तक्रारीवर कारवाई केली नाही. जशी इतर लोकसेवकावर तत्परतेने केली जाते तशी आम्ही दिलेल्या पुराव्याची शहानिशा करून त्या आधारे कारवाई करावी लागेल अशी मागणी केली. तलाठी आंधळे यांच्या तक्रारीत म्हटले आहे की पाडवी यांनी प्रत्येक गुन्हातून 70 हजार ते 1 लाख रु. रक्कमेची वसुली केली आणि कारवाई केल्यास कोणताही लोकसेवक आपलेला भिऊन पैसे देतो व यातून पैसे काढता येतात आपली तक्रार कोणी करत नाही या उद्देशाने पाडवी नियम धाब्यावर बसून कारवाई करत आहेत म्हणूनच त्यांनी 7/12 नककल 240/- रू फि ला लाच म्हटले. याबाबत आम्ही त्यांच्या वसुलीचा पूरावा दिला आहे. त्यानुसार त्यांची तात्काळ चौकशी करावी.  जर एसीबीचे अधिकारी लाखो रू. ची लाच घेत असतील तर भ्रष्टाचार कसा थांबेल असा ही सवाल तक्रारीत उपस्थित केला आहे.
या दोन्ही तक्रारीवरून राज्याच्या एसीबी विभागला पक्का हादरा बसला असून राज्याच्या लाचलुचपत विभागाचे पोलीस महासंचालकाने याची दखल घेऊन बीड एसीबीतील पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी यांची तडकाफडकी उचलबांगडी करून त्यांना औंरगाबाद परिक्षेत्र याठिकाणी संलग्न केले आहे.
मात्र तलाठी आंधळे व शेख जमालोद्दीन हे गुन्हा दाखल करण्याच्या मागणी वर ठाम आसून  अशी विनंती त्यांनी राज्याच्या गृहमंत्री,गृह सचिव व पोलीस महासंचालक म.राज्य यांच्याकडे देखील केली आहे.
गुन्हा दाखल नाही झाल्यास तलाठी आंधळे व शेख जमालोद्दीन मुख्यमंत्री यांचे कडे दाद मागतात की, न्यायालयात जातात याकडे लक्ष लागून आहे. मात्र यातून हे नक्की की शासनाची विश्वासू व भ्रष्टाचार प्रतिबंद करणारी संस्थाच वसुली करीत आहे. याकडे मुख्यमंत्री यांनी गंभीर दखल घ्यावी व दोषी अधिकारी यांच्यावर कठोर करावी हे वसुली रॅकेट थांबवावे जर एसीबी अधिकारीच लाचखोरी करीत असेल तर इतर विभागात काय परिस्थिती  असेल असा प्रश्न जनसामान्यांतून उपस्थित होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!