Home बीड जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर पोलीसांचा लाठीमार, डीवायएसपींना धक्काबुक्की? काही जण ताब्यात

जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर पोलीसांचा लाठीमार, डीवायएसपींना धक्काबुक्की? काही जण ताब्यात

बीड (रिपोर्टर):- जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. उपस्थित लोकांना गर्दी करू नका, असे आवाहन करूनही लोक ऐकत नसल्याचे पाहून पोलीसांनी जिल्हा रुग्णालयात सौम्य लाठीमार केल्याची घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लसीकरण केंद्रावर घडली. या वेळी डिवायएसपी वाळके यांना धक्काबुक्की झाल्याचेही बोलले जाते. या प्रकरणात पाच ते सात जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाचा संभाव्य धोका टळतो हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी उत्सुक असून आज बीडच्या जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोंया प्रमाणावर लोकांनी गर्दी केली. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. या वेळी उपस्थित डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी ‘गर्दी करू नका, सोशल डिस्टन्स पाळा’, असे सांगितले मात्र लोक ऐकत नसल्याचे पाहून आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह डीवायएसपी वाळके हे घटनास्थळी आली. लोकांना गर्दी करू नका, असे आवाहन केले परंतु लोक ऐकत नसल्याचे पाहून पोलीसांनी बळाचा वापर करत सौम्य लाठीमार केला. या वेळी डीवायएसपी वाळकेंना धक्काबुक्की झाल्याचे समजते. या प्रकरणात बीड शहर पोलीसांनी पाच ते सहा जणांना ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात येते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

error: Content is protected !!