Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाओळखपत्र दाखवूनही रुग्णालयीन कर्मचार्‍यांना डीवायएसपींकडून मारहाण

ओळखपत्र दाखवूनही रुग्णालयीन कर्मचार्‍यांना डीवायएसपींकडून मारहाण

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये तीन दिवसाचे कडक लॉकडाऊन लावण्यात आले. यामध्ये मेडिकल, रूग्णालय यांना सुट देण्यात आलेली असतांनाही रूग्णालयामध्ये जात असतांना दोन कर्मचार्‍यांना डिवायएपी वाळके यांनी बेदमपणे मारहाण करून जखमी केले. ही घटना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास माळीवेस चौकामध्ये घडली.

बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज, उद्या आणि परवा असे दिन दिवस कडक निर्बंध लावलेले आहेत. यात रूग्णालय, मेडिकल यांना सुट देण्यात आलेली आहे. आज सकाळी सदगुरू श्री रूग्णालयामध्ये काम करणारे चैतन्य शहाणे आणि राठोड क्लिनीकमध्ये काम करणारे विठ्ठल क्षीरसागर हे आपल्या मोटर सायकलवरून जात होते. त्यांना डिवायएसपी संतोष वाळके यांनी माळीवेस चौक येथे अडवले. सदरील कर्मचार्‍यांनी रूग्णालयाचे ओळखपत्र दाखवले तरीही त्यांना जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये क्षीरसागर यांच्या हाताला जबर मार लागला. त्यात त्यांचे दोन बोटे फ्रॅक्चर झाले. आरोग्य सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांना मारहाण करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याची दखल जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी घ्यावी व मारहाण करणार्‍या डिवायएसीप यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!