Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeकोरोनाडॉक्टरास मारहाण प्रकरणी आरोग्य कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन तहसीलवर मोर्चा

डॉक्टरास मारहाण प्रकरणी आरोग्य कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन तहसीलवर मोर्चा


आष्टी (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये तीन दिवसांचे कडक लॉकडाऊन करण्यात आले. काल पोलीस प्रशासनाच्या वतीने काही ठिकाणी आरोग्य विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांसह डॉक्टरास मारहाण करण्यात आली. या मारहाणीच्या निषेधार्थ आज आष्टीच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले होते.
काल डीवायएसपी वाळके यांनी आरोग्य विभागात काम करणार्‍या कामगारांना मारहाण केली. यामुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात होता. आष्टी येथील डॉ. विशाल वनवे यांनाही चर्‍हाटा फाट्यावर मारहाण झाली. या मारहाणीच्या निषेधार्थ आज आष्टीच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले होते. याबाबत प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले.

Most Popular

error: Content is protected !!