Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeकोरोनाधारूर शहरात लसीकरणाचा फज्जा आरोग्य विभागाचे नियोजन कोलमडले लसीकरण केंद्र बनले कोरोना...

धारूर शहरात लसीकरणाचा फज्जा आरोग्य विभागाचे नियोजन कोलमडले लसीकरण केंद्र बनले कोरोना स्प्रेडर


महसूल व पोलिस प्रशासनाची बघ्याची भूमिका
किल्ले धारूर( रिपोर्टर) धारूर शहरामध्ये आज लसीकरणाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले लसीकरण केंद्रावर गर्दीच गर्दी दिसून आली शहारत लसीकरनास सुरुवात झाली खरी परंतु आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे लसीकरण केंद्र कोरोना सुपर स्प्रेडर बनत आहेत
धारूर शहरात आज वडगावकर गल्लीतील नगरेश्वर मंगल कार्यालयात ४५ वर्षे वयावरील वृद्ध व्यक्ती तसेच १८ ते ४४ वयातील व्यक्तींना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे यामुळे नगरेश्वर मंगल कार्यालयात लस घेण्यासाठी खूप मोठी गर्दी झाली. गर्दी आवरणामध्ये पोलीस प्रशासन अपयशी ठरले यातून आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा समोर आले आहे कुठलेही नियोजन लसीकरणासाठी दिसून आले नाही दोन्ही वयोगटातील व्यक्तींना एकाच ठिकाणी लसीकरणासाठी बोलवल्यामुळे खूप मोठी गर्दी झाली होती लस घेण्यापेक्षा मरणाची भीती नागरिकांना या ठिकाणी वाटत आहे. या गर्दीमध्ये एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर संपूर्ण नागरिकांना कोरोणाची लागण होऊ शकते याकडे आरोग्य विभागाचे सपशेल दुर्लक्ष दिसत आहे. काही वयोवृद्ध व्यक्तींकडे अँड्रॉइड मोबाईल देखील नाहीत तर काही मोबाईल नसणारे गरीब व्यक्ती फक्त इतरांकडे पाहताना दिसून आले. त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे नागरिकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे प्रशासन म्हणते ज्या व्यक्तींना लक्ष द्यायची आहे अशा व्यक्तींना फोन करून लसीकरणासाठी बोलवा परंतु धारूर ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कोणत्याही व्यक्तीला फोन करण्यात आला नाही किंवा बोलावण्यात आले नाही फक्त सोशल मीडिया वरून लस आली आहे घेण्यासाठी या अशा सूचना देण्यात आल्या त्यामुळे शहरातील अनेक नागरिक आज लस घेण्यासाठी नगरेश्वर मंगल कार्यालय आले तेथे गर्दीच गर्दी झाली होती यातून नगरेश्वर मंगल कार्यालयात जत्रा भरली आहे की काय असे दृश्य दिसत होतेधारुरच्या आरोग्य विभागाचा नेहमीच नियोजनाचा अभाव दिसून येतो धारूर मधील आरोग्य विभागाने कोरोनाचे भान ठेवून काम करायला हवे नसता धरून शहरात घराघरात कोरोना पसरेल.

Most Popular

error: Content is protected !!