नेकनूर (रिपोर्टर) ग्रामपंचायतअंतर्गत जे काही कामे झालेली आहेत ती कामे बोगस झालेली असून याबाबतचे वृत्त काल रिपोर्टरमध्ये प्रकाशीत झाल्यानंतर याची दखल प्रशासकीय पातळीवर घेऊन वादग्रस्त ग्रामसेवक बहिरवाळ यांची बदली करण्यात आली. त्यांची नुसती बदली न करता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
नेकनूरच्या विकासासाठी शासनाने लाखो रुपयांचा निधी ग्रा.पं.ला दिला होता. ग्रामपंचायतीने थातूरमातूर कामे करून निधीत अपहार केला. यामध्ये सरपंचासह ग्रामसेवक बहिरवाळ यांची मिलीभगत आहे. या अपहार प्रकरणाची काल रिपोर्टरमध्ये बातमी प्रकाशीत होताच याची दखल वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांनी घेऊन बहिरवाळ यांची तडकाफडकी बदली केली मात्र त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.