Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोविड सेंटरमध्ये डॉक्टराचा हलगर्जीपणा; तहसीलदारांनी पंचनामा करून डॉक्टरास केले तडकाफडकी कार्यमुक्त

कोविड सेंटरमध्ये डॉक्टराचा हलगर्जीपणा; तहसीलदारांनी पंचनामा करून डॉक्टरास केले तडकाफडकी कार्यमुक्त

धारूर (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तालुका पातळीवर कोरोना सेंटर उभारण्यात आले. धारूर येथील केज रोडवर असलेल्या कोविड सेंटरमध्ये नियुक्त केलेल्या डॉक्टराचा हलगर्जीपणा उघडकीस आला. आज सकाळी तहसीलदार व आरोग्य अधिकार्‍यांनी कोविड सेंटरची पाहणी केली असता त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नसल्याने त्यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले.
बीड जिल्ह्यामध्ये दररोज बाराशेपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता तालुका पातळीवर कोविड सेंटर उभारण्यात आले. धारूर येथील केज रोडवरील कस्तुरबा गांधी शाळेत कोविड सेंटर उभारले असून या ठिकाणी सध्या सत्तर रुग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरमध्ये डॉ. अजय बुजगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान बुजगुडे यांनी ड्युटी बजावयाची आहे. असे असताना संबंधित डॉक्टर हे कामात हलगर्जीपणा करतात व वेळेवर संेंटरमध्ये उपस्थित राहत नाहीत. याबाबतच्या काही तक्रारी तहसीलदार व आरोग्य विभागाकडे करण्यात आल्या होत्या. आज तहसीलदार वंदना शिडोळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वीती तिडके, डॉ. अमोल दुबे यांनी कोविड सेंटरची पाहणी करून पंचनामा केला असता त्यांना डॉ. बुजगुळे हे हजर नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर तात्काळ कार्यमुक्तीची कारवाई करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!