Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनागेवराई शहरात दुपारपर्यंत 56 कारवाया

गेवराई शहरात दुपारपर्यंत 56 कारवाया


नियमाचे उल्लंघन करणार्‍यांकडून 13 हजाराचा दंड वसूल
बीडमध्ये वाहनधारकांची कसून चौकशी
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नियमाचे उल्लंघन; दुकाने सुुरुच

बीड/गेवराई (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले असले तरी काही नागरीक नियमाचे उल्लंघन करत असल्याने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बीड शहरातल्या विविध ठिकाणी पोलीसांकडून सडकफिर्‍यांची चौकशी केली जात आहे. तर ग्रामीण भागामध्ये अनेक दुकानदार नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी दुकाना उघडून व्यापारी नागरिकांना मालाची सर्रासपणे विक्री करू लागले आहेत. गेवराई शहरात आज सकाळपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली. दुपारपर्यंत 56 कारवाया करण्यात आल्या. यामध्ये 13 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


राज्य सरकारने 31 मेपर्यंत लॉकडाऊन घोषीत केलेले आहे. लॉकडाऊनची योग्य अमलबजावणी करण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला सडक फिर्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर दंडामक कारवाई केली जात आहे. बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोलीसांनी वाहनधारकांची चौकशी सुरू केली आहे. त्याचबरोबर शहरातील अन्य ठिकाणीही पोलीस बाहेरून येणार्‍या वाहनांची चौकशी करतात. दोषी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. शहरात दुकाने पुर्णत: बंद असले तरी ग्रामीण भागात मात्र काही दुकानदार नियमांचे उल्लंघन करू लागले. अर्धे दुकाने उघडून लोकांना माल विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. अशा दुकानदारांविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाई करायला हवी. गेवराई येथे आज दुपारपर्यंत 56 कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये 13 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई नगरपालिका आणि गेवराईचे पोलीस रविंद्र पेरगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक टाकसाळ, मनिषा जोगदंड, कावळे, पोतदार, व्हरकटे, प्रधान यांनी केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!