नेकनूर (रिपोटर)ः- नेकनूर ग्राम पंचायतीने वित्त आयोगात लाखो रुपयाचा घोटाळा केला असून वस्तू खरेदी न करता ग्रामसेवक आणि सरपंच यांनी वित्त आयोगावरील खात्यावरील निधी उचलला आहे. याबाबत रिपोर्टर प्रकाशीत केल्यानंतर पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मोकाटे यांनी बीड पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी चौकशी करुन दोन दिवसात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
नेकनूर ग्राम पंचायतीमध्ये ग्रामनिधी आणि पंधरा वित्त आयोगातील निधी खर्च करतांना तो योग्य कामासाठी खर्च न करता वस्तूची खरेदी न करता सरपंच आणि ग्रामसेवक यांनी हा निधी उचलला. याबाबत वारंवार सायं दैनिक बीड रिपोर्टरने या भ्रष्टाचाराबाबत वृत्त प्रकाशीत केल्यानंतर याची दखल घेत बीड जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मोकाटे यांनी बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप यांनी नेकनूर ग्रामपंचायतीचे कॅश बूक, लेझर बुक, वस्तूची खरेदी झाली का नाही, वित्त आयोगातून काय काय काम केलेे याबाबत स्वतः भेट देवून वस्तू निष्ठ अहवाल दोन दिवसात बीड जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला सादर करावा असे लेखी आदेश दिलेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक आणि सरपंचामध्ये धांदल उडालेली आहे.










