बीड (रिपोर्टर) शेतीच्या वादातून आष्टी तालुक्यातील धानोरा येथे दोन गट समोरासमोर आले या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून एकूण सात जणांविरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोपट मारुती ढवळे (55) यांनी दिलेल तक्रारीनुसार, ते आपल्या शेतातील सर्वे क्रमांक 121/63 मध्ये कांदा व उसाच्या पिकाला पाणी देत असताना अशोक एकनाथ गव्हाणे, अलका अशोक गव्हाणे, संदीप अशोक गव्हाणे व मनिषा संदीप गव्हाणे यांनी त्यांना आमच्या शेतात स्कूटी उभी का केली असे म्हणून शिविगाळ करुन मारहाण केली व जखमी केले.
या प्रकरणात अशोक एकनाथ गव्हाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या शेतात गेले असताना हे शेत आमचे आहे तुम्ही इथे ाचे नाही असे म्हणून पोपट मारुती ढवळे, सागर पोपट ढवळे व आशाबाई मारुती ढवळे यांनी तंना शिविगाळ करुन मारहाण केली. प्रकरणी दोन्ही गटाच तक्रारीवरून परस्पर विरोधी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.