मुंबई (रिपोर्टर) फेब्रुवारी महिना संपून आता मार्च महिना सुरु होईल. अशातच वर्षाचा तिसरा महिना सुरु होण्यापूर्वी बँक एकूण किती दिवस बंद राहणार आहेत, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंगमुळे लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास डिमांड ड्राफ्ट इत्यादी कामांसाठी बँकेची गरज भासते. जर तुम्हाला बँकेतील काही महत्त्वाचं काम मार्च महिन्यात पूर्ण करायचं असेल तर या संपूर्ण महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणं गरजेचं आहे.
मार्च महिन्यात 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार मार्च महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कॅलेंडरनुसार मार्च महिन्यात एकूण 12 दिवस बँक सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणार्या सणांवर आधारित आहे.