बीड (रिपोर्टर) : जैन धर्मात संथारा व्रताला अगण्य स्थान आहे. या अनुषंगानेच पृथ्वीराज आब्बड यांच्या मातोश्री तथा प्रफुल्ल आब्बड यांच्या दादीजी श्रीमती मदनबाई प्रेमराजजी आब्बड यांनी 20 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी साडे बारा वाजता वयाच्या 94 वर्षी पवित्र संथारा व्रत धारण केले होते. त्यांनी 20 फेब्रुवारी रोजी संथारा व्रत घेतला होता. शेवटच्या श्वासापर्यंत अन्नाचा कणही घेणार नाहीत, असा निश्चय त्यांनी केला होता, व्रताचे सात दिवस पुर्ण होवून आठव्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे साडे चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्या एक आदर्श माता असून साधू-संतांबद्दल त्यांना प्रेम आणि आस्था होती, त्यामुळेच आयुष्यभर त्यांनी साधू-संतांची सेवा केली. त्यांनी आपल्या आयुष्यात कसलाही मोह ठेवला नाही, त्या आपल्या तत्वावर नेहमीच ठाम असायच्या, अनुकुल परिस्थितीत त्यांनी कधी उनमात केला नाही तर प्रतिकुल परिस्थितीत कधी नैराश्यही दाखवले नाही, परिवारातील प्रत्येकाला समजून घेणार्या त्या होत्या. त्यांना सात मुली, एक मुलगा, एक नातू असा मोठा परिवार आहे. त्यांची अंतिम यात्रा आज दि. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता पृथ्वीराज आब्बड यांच्या निवासस्तानापासून निघून मोंढा रोड येथील अमरधाम स्मशानभुमित त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. संपादक विजयराज बंब यांच्या त्या सासू असून आब्बड कुटूंबियांच्या दुखात बंब आणि रिपोर्टर परिवार सहभागी आहे.









