Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमशॉर्ट सर्किटने घराला आग मायलेकीचा जळून मृत्यू; किट्टी आडगाव येथे घडली दुर्दैवी...

शॉर्ट सर्किटने घराला आग मायलेकीचा जळून मृत्यू; किट्टी आडगाव येथे घडली दुर्दैवी घटना


माजलगाव/तेलगाव (रिपोर्टर):- शॉर्टसर्कीटने घराला आग लागल्याने या आगीमध्ये झोपेत असलेल्या मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे घडली. घटनेची माहिती माजलगाव ग्रामीण पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. या घटनेने माजलगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.


शशिकला शंकरराव फफाळ (वय 65) व सखुबाई शंकरराव फफाळ (वय 45) या मायलेकी घरामध्ये झोपलेल्या होत्या. सकाळी अचानकपणे शॉर्टसर्कीट होवून घराला आग लागली. या आगीत या दोन्ही मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती माजलगाव पोलीसांना झाल्यानंतर ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे, उपनिरीक्षक ईधाटे, पोलीस कर्मचारी राठोड यांनी धाव घेतली व पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!