Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमतहसीलदारांनी ढेकणमोहा येथे पकडला हायवा

तहसीलदारांनी ढेकणमोहा येथे पकडला हायवा


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी सुुरूच आहे. हायवासह इतर वाहनातून वाळूची चोरी केली जाते. ढेकणमोहाजवळ तहसीलदार यांनी अवैधरित्या वाळू घेवून जाणारा टिप्पर पकडून तो जप्त केला आहे.
बीड परिसरातील अनेक भागातून वाळूची तस्करी केली जाते. वाळू तस्कराविरोधात ठोस कारवाई होत नसल्यानेच रात्रन्दिवस वाळूचा उपसा होत आहे. आज सकाळी ढेकणमोहा येथे तहसीलदार यांना अवैधरित्या वाळू घेवून जाणारा हायवा दिसून आला. यावेळी सदरील हायवा महसूल विभागाने ताब्यात घेवून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आला. ही कारवाई तहसीलदार वमने, तलाठी रोहित आंधळे यांनी केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!