Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका; बीड अलर्ट लहान मुलांच्या आरोग्यासाठी टास्कफोर्सची स्थापना

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका; बीड अलर्ट लहान मुलांच्या आरोग्यासाठी टास्कफोर्सची स्थापना


समितीमध्ये सात डॉक्टरांचा समावेश; कोरोना संदर्भात समिती करणार मार्गदर्शन
बीड (रिपोर्टर):- कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातील हजारो नागरीक बाधित झाले. तिसर्‍या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिलेला आहे. त्यानुसार बीड येथे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी वैद्यकीय तज्ञांचा टास्कफोर्स स्थापन केला आहे.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा एक भाग म्हणून लहान मुलांचे कोव्हिड वरील उपचार, आयसीयु व्यवस्था तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजने बाबत मार्गदर्शन करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमीत करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या अधीन राहून बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येणार आहे. सदरील समितीमध्ये डॉ.संभाजी चाटे, अध्यक्ष बालरोग विभाग प्रमुख स्वाराती अंबाजोगाई, डॉ.राम देशपांडे सदस्य सचिव बालरोग तज्ज्ञ जिल्हा रूग्णालय बीड, डॉ.अनुराग पांगरीकर समन्वय आयएमए अध्यक्ष बीड, डॉ.पी.सी.तांबडे सदस्य आयपी अध्यक्ष बीड, डॉ.सचिन आंधळकर सदस्य बालरोग तज्ञ कुटीर रूग्णालय नेकनूर, डॉ.शंकर काशिद सदस्य बालरोग तज्ज्ञ जिल्हा रूग्णालय बीड, डॉ.रमेश लोमटे सदस्य बालरोग तज्ज्ञ स्वाराती आंबाजोगाई यांचा समावेश आहे. वैद्यकीय तज्ञ जिल्ह्यातील बालरोग तज्ञ, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी व सर्व्हेक्षणामध्ये सहभागी कर्मचारी यांना आयसी एमआर यांच्या प्रोटोकॉलनुसार लहान मुलांचे कोव्हिड 19 वरील उपचार, आयसीयु व्यवस्था तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!