Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोना72 केंद्रावर आजपासून लसीकरणाला सुरूवात कोव्हीशिल्डच्या 27 हजार 840 लस मिळाल्या

72 केंद्रावर आजपासून लसीकरणाला सुरूवात कोव्हीशिल्डच्या 27 हजार 840 लस मिळाल्या


बीड (रिपोर्टर)ः- कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील सर्वांना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र लस उपलब्ध नसल्याने काही दिवस लसीकरण थांबवण्यात आले होते. आता लस उपलब्ध झाल्याने आजपासून लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यातील 72 केंद्रावर लस दिली जात आहे. कोव्हीशिल्डचे 27 हजार 840 डोस मिळालेले आहे.
कोरोनाची दुसरी लाट खतरनाक ठरत आहे. यामध्ये आतापर्यंत अनेकांची जिव गेला. कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. मात्र लस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने काही दिवस लसीकरण थांबवण्याची वेळ आरोग्य प्रशासनावर आली होती. 18 ते 45 वयोगटातील नागरीकांना लस दिली जात आहे. काल बीड जिल्ह्यासाठी कोव्हीशिल्डच्या 27 हजार 840 लस उपलब्ध झाले असून जिल्हाभरातील 72 केंद्रावर  लसीकरणाला सुरूवात झाली. नाव नोंदणीसाठी सबंधीत नागरीक केंद्रावर सकाळपासूनच उपस्थित होते. बीड शहरातील चंपावती शाळेतही अनेक नागरीकांनी लस घेण्यासाठी उपस्थिती दर्शविली होती.

Most Popular

error: Content is protected !!