माजलगाव, (दिनकर शिंदे) : नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (चझडउ) राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यात महीला उमेदवारामधून प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यातीत तिसरा क्रमांक येण्याचा मान आपल्या माजलगावची कन्या सोनाली अर्जुन मात्रे हिने पटकाविला आहे.
शेतकर्याची कन्या आज राज्यात प्रथम आल्याने माजलगाव सह संपूर्ण राज्यात ही अभिमानाची गोष्ट आहे. आयोगाने 405 पदांसाठी 7, 8 व 9 मे 2022 रोजी मुख्य परीक्षा घेतली होती. सदर परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. मंगळवार दिनांक 28 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामधे प्रमोद चौगुले यांनी 633 गुणांसह राज्यात पहिला क्रमांक पटकावला तर शुभम पाटीलला 616 गुण मिळाले आहेत. शुभम पाटील दुसरा आला आहे. महिलामध्ये सोनाली मात्रे पहिली आहे, तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत सोनालीला तिसरा क्रमांक मिळाला आहे. सोनाली ही माजलगाव तालुक्यातील ईरला मजरा येथील रहिवाशी असून शेतकरी अर्जुन मात्रे यांची कन्या आहे. सोनालीच्या रूपाने राज्यात एमपीएससी परीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, तहसीलदार सह एकूण 20 पदांच्या 405 जागांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेब लिंक उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
एक जिद्द होती की आपली मुलगी आपलं नाव मोठं करेल आणि माझं नाव गावात किंव्हा राज्यात गाजवेल ते तिने करून दाखवले एक बाप म्हणून आज मला याचा अभिमान वाटतो मी शेतात कष्ट करून माझं स्वप्न साकार केलं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज ती इथपर्यंत पोहचली.
– अर्जुन मात्रे
(वडील) ईरला मजरा