Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनानियमाचे उल्लंघन करणार्‍या सहा दुकानदारांवर कारवाई मोक्कार फिरणार्‍यांकडून 15 हजाराचा दंड वसूल

नियमाचे उल्लंघन करणार्‍या सहा दुकानदारांवर कारवाई मोक्कार फिरणार्‍यांकडून 15 हजाराचा दंड वसूल


गेवराई (रिपोर्टर) पोलीस प्रशासन व  नगरपरिषदेच्या वतीने लॉकडाऊनचे नियम तोडणार्‍या व विनामास्क मोकाट फिरणार्‍या विरुद्धची कारवाई मोहीम सुरूच असून गेवराई पोलीस प्रशासनाच्या वतीने आज  सकाळपासून विविध ठिकाणी कारवाया करत दुपारपर्यंत 15 हजार 100 रुपयाची दंड वसुली करण्यात आली.
कोविडच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आलेले असताना विनाकारण मोकाट फिरणारे व लॉकडाऊनचे नियम तोडणार्‍या विरोधात पोलीस प्रशासन व न.प.ची कारवाई मोहीम सुरू असून आज गेवराई पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड व पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून भाजी मंडई येथे नियम तोडून गर्दी जमवत भाजी विक्री करणार्‍या 6 जणांवर भा.द.वी. कलम 188 नुसार कारवाई करण्यात केली. या कारवाईत सपोनि प्रफुल्ल साबळे, शरद बहिरवाळ, सरोदे यांचा सहभाग होता. यासह खामगाव, बीड बायपास जवळील झमझम पेट्रोल पंप व पांढरवाडी फाटा या ठिकाणी कारवाया करून दंड वसुली केली.
यामध्ये पांढरवाडी फाटा येथे चेक बॅरिगेट लावून 31 कारवाया केल्यात असून यात एकूण 7 हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली. या कारवाया पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, पो.ना.संतोष गाडे, किरण पोतदार यांच्यासह आदींनी केली. तसेच बायपास वरील झमझम पेट्रोल पंप येथे चेक नाका लावून 16 कारवाया करत 4 हजार रुपये दंड वसुली करण्यात आली. या  कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, पो.ना. शरद बहिरवाळ, हनुमान जावळे, सय्यद यांच्यासह आदींनी केल्या. तर खामगाव येथील चेक पोस्ट वर मोकाट फिरणारे 15 जण व विनामास्क फिरणार्‍या 6 जणांवर कारवाई करत 4 हजार 100 रु दंड वसुली करण्यात आली. ही कारवाई स.पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, नागरे, विशाल प्रधान आदी पोलीस कर्मचारी होते. या सर्व कारवाया सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात आल्या असून सर्व ठिकाणच्या विविध केलेल्या कारवाया मध्ये एकूण 15 हजार 100 रुपयाची दंड वसुली करण्यात आली. या कारवाईने मोकाट फिणार्‍यामध्ये दहशत निर्माण झाल्याने शहरात शुकशुकाट दिसून येत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!