Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना हद्दपार होत नाही तोपर्यंत नियमाचे काटेकोर पालन होणार

जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना हद्दपार होत नाही तोपर्यंत नियमाचे काटेकोर पालन होणार

मला रिस्क’ घ्यायची नाही, लोकांचे जीव महत्वाचे आहेत, आकडे कमी येत असले तरी लोकांनो, काळजी घ्या


बीड (रिपोर्टर):- मराठवाड्यात सर्वाधिक रुण बीड जिल्ह्यात आहेत. समुहसंसर्गाचा आपला आलेख रोज कमी-जास्त होत आहे. त्यामुळे मला रिस्क घ्यायची नाही. लोकांचे जीव महत्वाचे आहेत, आकडे कमी येत असले तरी लोकांनो काळजी घ्या, सोशल डिस्टन्सचे पालन करा, जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही तोपर्यंत नियमांचे काटेकोरपणे पालन होणारच, असे म्हणत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी खरीप हंगामासह पावसाळ्याची परिस्थिती पाहून आज-उद्या लॉकडाऊन कमी-जास्ती बाबत आज-उद्या निर्णय घेऊ. लोकांनी आजपर्यंत प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे, असे त्यांनी या वेळी म्हटले.


   सायं. दैनिक बीड रिपोर्टरने आज थेट जिल्हाधिकारी रविंद्र जताप यांच्याशी संवाद साधून 25 मे नंतर जिल्ह्यातला लॉकडाऊन कसा असेल, यावर माहिती घेतली. या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले, सध्याची परिस्थिती बिकट आहे. मराठवाड्यात सर्वाधिक रुग्ण हे बीड जिल्ह्यात आढळून येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मला रिस्क घ्यायची नाही, लोकांचे जीव माझ्यासाठी महत्वाचे आहेत. आकडे कमी येत असले तरी लोकांनो काळजी घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही तोपर्यंत नियमांचे काटेकोरपणे पालन होणारच.

आता पावसाळा आला आहे, करीप हंगामही आहे, अनेकांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, अशा परिस्थितीतून मार्ग काढत लॉकडाऊन शिथिलतेबाबत अथवा वाढवण्याबाबत जिल्हा प्रशासन सर्व अभ्यास करून आज-उद्या आदेश काढेलच परंतु यापेक्षा सध्या जिल्ह्याची परिस्थिती ही आकड्यात समाधानकारक वाटत असली तरी रोज कमी-जास्त आढळून येत असल्यामुळे ती चिंताजनकच आहे.

अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातून कोरोना कायमचा हद्दपार करण्याइरादे आपण पावले उचलत आहोत. जिल्हा प्रशासन, आरोग्य सेवा, सामाजिक संस्था, समाजसेवक, बीडमधील जनता या लढाईमध्ये प्रशासनासोबत राहिली आहे. अजूनही कोरोनाची लढाई संपलेली नाही. या लढाईत आपला विजय निश्‍चित असून त्यासाठी धैर्य ठेवून संघर्ष करणं आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे. असे म्हणत जिल्हाधिकार्‍यांनी निर्णय काय येईल याची वाट बघण्यापेक्षा मास्क लावा, सोशल डिस्टन्स पाळा, शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करा, असे आवाहन केले.

Most Popular

error: Content is protected !!