जिल्हाधिकार्यांची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट; रुग्णालयात स्वच्छता ठेवा, रुग्णसेवेला महत्व द्या -दीपा मुंडे
बीड (रिपोर्टर): काय गं कशी आहे तब्येत… बाळ कसे आहे, दुखत आहे का? किती दिवस झाले सिझर होऊन, बाळाचं वजन किती आहे, बाळ पितेय का? काही अडचण आहे का? असे एक ना अनेक विचारून बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी आज भल्या सकाळी जिल्हा रुग्णालयाची तब्बल दोन ते अडीच तास पाहणी केली. उपस्थित रुग्णांना बोलतं करत अडीअडचणी विचारल्य. रुग्णालयातल्या प्रत्येक वार्डासह आयपीओ, आयसीयू, ओटी, लेबर रूम, औषध विभाग याची पाहणी केली. शिकावू डॉक्टरांपैकी दोघांना रोज रुग्णालयातील स्वच्छतेच्या पाहणीवर ठेवण्याच्या सूचना देत जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी आरोग्य सेवा सदृश बनविण्या हेतू सतर्क राहून काम करण्याच्याही सूचना दिल्या.
आज सकाळी 9 वा. 20 मिनिटाला अचानक जिल्हाधिकारी दीपा मुंडे या जिल्हा रुग्णालयामध्ये डेरेदाखल झाल्या. त्यांच्या येण्याची माहिती कुणालाही देण्यात आली नव्हती. दवाखान्यात डेरेदाखल होताच त्यांनी रुग्णालयातील छोट्या छोटट्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून पाहणी केली. डिलेव्हरी वार्डमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. बाळ आणि बाळंतीण यांच्या सोबत गप्पातून प्रश्न उपस्थित करत अडचणी विचारल्या. सिझर वार्डामध्ये प्रत्येक रुग्णाच्या बेडजवळ जावून आस्थेवाईकपणे चौकशी केली. पुढे त्यांनी आयपीओ, आयसीयू, सिझर वार्ड, लेबर रूमसह डायलेसीस वार्ड, औषधालय यासह अन्य पाच ते सात वार्डात जावून पाहणी केली. जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी चार्ज घेतल्यानंतर प्रथमच त्या जिल्हा रुग्णालयात पाहणीसाठी आल्या होत्या. उपस्थित कर्मचार्यांसोबत संवाद साधत रुग्णसेवा करण्याच्या सूचना देत जे शिकावू डॉक्टर आहेत त्यापैकी रोज दोघांना रुग्णालयातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्याबाबत जबाबदारी देण्याची जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळेंना सूचना दिल्या. त्यांनी वार्डासह वार्डाबाहेर स्वच्छतेची पाहणी करून अस्वच्छ असलेल्या ठिकाणी स्वच्छता करून घेणे हे त्यांचे काम असेल, जिल्हाधिकारी मुंडे यांनी रुग्णालयातले काम पाहता समाधान व्यक्त केले.
तुम्ही जिथं रिपोर्टर तिथं
जिल्हाधिकारी दीपा मुंडे या जिल्हा रुग्णालयामध्ये भल्या सकाळी पाहणीसाठी आल्या असता रुग्णालयात रिपोर्टर उपस्थित होता. तो जेव्हा फोटो काढू लागला तेव्हा दीपा मुंडेंनी रिपोर्टरला विचारले, आपण कोण? रिपोर्टरने आपली ओळख करून दिल्यानंतर मुंडे म्हणाल्या, मी तर कुणालाच सांगितलं नव्हतं, दस्तुरखुद्द जिल्हा शल्यचिकित्सकांनाही मी येणार असल्याची माहिती दिलेली नव्हती, मग तुम्ही हजर कसे? तेव्हा रिपोर्टरने तुम्ही जिथं रिपोर्टर तिथं असं उत्तर दिलं. जिल्हाधिकार्यांनी स्मित हास्य करत रिपोर्टरच्या कार्यतत्पर रिपोर्टींगला सकारात्मक घेतल